
अपघाताचे वृत्त बाजार भोगाव ...बाजार भोगाव येथील अपघात पोहाळे चा वृद्ध ठार
23101
पोहाळे तर्फ बोरगावच्या
वृद्धाचा अपघाती मृत्यू
बाजार भोगावात घटना; दुचाकीच्या हँडलमध्ये सळी अडकली
बाजार भोगाव, ता. १९ : येथील केडीसीसी बँक शाखेच्या नजीकच्या वळणावर मालवाहू टेंपोमधील लोखंडी सळी दुचाकीच्या हॕन्डलमध्ये अडकल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या बाबू हरी माळवी (वय ७३, पोहाळे तर्फ बोरगाव, ता. पन्हाळा) यांचे डोके डांबरी रस्त्यावर आपटले. गंभीर जखमी श्री. माळवी यांचा सीपीआरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याबाबत समजलेली माहिती अशी, सायंकाळी पाचच्या सुमारास पोहाळे तर्फ बोरगाव येथील सरदार चंद्राप्पा पाटील व बाबू हरी माळवी कामानिमित्त बाजार भोगाव येथे आले होते. यावेळी भंगार भरून पोर्लेकडे निघालेल्या टेंपोतील हौद्यातून बाहेर आलेल्या लोखंडी सळी दुचाकीचे हॕन्डल अडकल्याने दुचाकीस्वाराचा तोल केल्याने दुचाकीवर मागे बसलेले बाबू माळवी खाली पडल्याने त्याच्या डोक्यास मार लागला. त्यांना बाजारपेठेतील नागरिकांनी बाजार भोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथून रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये नेले; पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदननंतर त्यांच्यावर रात्री पोहाळे येथे अंत्यसंस्कार केले.
Web Title: Todays Latest Marathi News Bjb22b01011 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..