
बाजार भोगाव विशेष ग्रामसभा : बाजार भोगावच्या विधवा सरपंचांनी हळदी कुंकू लावून घातले सौभाग्य अलंकार: विधवा प्रथा बंदीबाबत कृतिशील पाऊल
01339
बाजारभोगाव ः विधवा प्रथा बंदीच्या ठरावानंतर गावातील उपस्थित विधवांना हळदी-कुंकूचे वाण देण्यात आले.
विधवा सरपंचांनी घातले सौभाग्य अलंकार
बाजारभोगावात ठरावाची स्वतःपासून अंमलबजावणी
बाजारभोगाव ः ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत विधवा प्रथा बंदीचा ठराव सर्वानुमते संमत झाला. त्यानंतर सरपंच श्रीमती माया नितीन पाटील यांनी स्वतः मंगळसूत्र घालत, हिरव्या बांगड्या भरून हळदी-कुंकू लावून घेत या ठरावाची स्वतःपासून अंमलबजावणी केली.
शासन निर्णय व विधवांच्या मनातील अस्वस्थतेची भावना लक्षात घेऊन ग्रामस्थांनी विधवा प्रथा बंदीस सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच पाटील यांनी केले. यावेळी माजी पोलिसपाटील बळीराम पाटील, दत्तात्रय शिंदे, रघुनाथ गवळी यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर या ठरावास ग्रामस्थांनी हात उंचावून मंजुरी दिली.
उपसरपंच मनीषा खोत व भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पूजा पाटील यांनी मनीषा तानाजी वडिंगेकर, सावित्री बाजीराव कांबळे, रूपाली संदीप सणगर, सुवर्णा हरी बने यांना हळदी-कुंकू लावून त्यांची ओटी भरली. ‘राजाराम’चे संचालक पांडुरंग पाटील, माजी उपसरपंच प्रभाकर कामेरकर, माजी सरपंच बाबासो खोत, दत्तात्रय खोत, खंडू बने, सुशांत कांबळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी पाटील, संजय खवळे, सागर पानारी, पोलिसपाटील छाया पोवार, शरद हंकारे, अमोल कांबळे, ग्रामसेवक जाधव उपस्थित होते. ग्रामपंचायतीचे लिपिक संदीप पाटील यांनी स्वागत केले.
Web Title: Todays Latest Marathi News Bjb22b01016 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..