पोलिस वृत्त/ बाजारभोगाव ः काळजवडेतील महिलेची कासारी नदीत आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त/  बाजारभोगाव ः काळजवडेतील महिलेची कासारी नदीत आत्महत्या
पोलिस वृत्त/ बाजारभोगाव ः काळजवडेतील महिलेची कासारी नदीत आत्महत्या

पोलिस वृत्त/ बाजारभोगाव ः काळजवडेतील महिलेची कासारी नदीत आत्महत्या

sakal_logo
By

काळजवडेतील महिलेची कासारी नदीत आत्महत्या

बाजारभोगाव ः पोर्ले तर्फ बोरगाव (ता.पन्हाळा) येथील कासारी नदीत उडी घेवून काळजवडेच्या महिलेने आत्महत्या केली.सुनिता आबा कांबळे (वय ४३,रा.काळजवडे,ता. पन्हाळा) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत कळे पोलिसांतून प्राप्त माहिती अशी, मानसिक स्थिती ठीक नसल्याने काळजवडेतील सुनिता आबा कांबळे यांच्यावर मागील पाच वर्षांपासून कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयासह एका खासगी रुग्णालयातही उपचार सुरु होते.काल गुरुवारी (ता.८) तिने पोर्ले तर्फ बोरगाव येथेच कासारी नदीत उडी घेण्याचा प्रयत्न केला होता.तथापी , स्थानिक नागरिकांनी जीवदान देवून तिला माहेरी पोहाळे तर्फ बोरगाव (ता.पन्हाळा) येथे पोहोचवले होते.आज(शुक्रवारी) पहाटे चारच्या सुमारास कोणासही न सांगता ती घराबाहेर पडली.सकाळी साडेसहाच्या सुमारास तिने पोर्ले तर्फ बोरगावच्या नदीपात्रात उडी घेतली.तिच्यामागे पती,तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.याबाबत मयत महिलेचे चुलतभाऊ सुरेश सदाशिव माळवी यांनी कळे पोलिसात वर्दी दिली.सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौजदार महादेव खाडे अधिक तपास करीत आहेत.
...
फोटो
सुनिता कांबळे.

Web Title: Todays Latest Marathi News Bjb22b01039 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..