बाजार भोगाव : पोहाळेच्या श्रमिक वाचनालयात वाचन प्रेरणा दिन विविध उपक्रमांनी साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजार भोगाव : पोहाळेच्या श्रमिक वाचनालयात वाचन प्रेरणा दिन विविध उपक्रमांनी साजरा
बाजार भोगाव : पोहाळेच्या श्रमिक वाचनालयात वाचन प्रेरणा दिन विविध उपक्रमांनी साजरा

बाजार भोगाव : पोहाळेच्या श्रमिक वाचनालयात वाचन प्रेरणा दिन विविध उपक्रमांनी साजरा

sakal_logo
By

पोहाळेचे श्रमिक वाचनालय
बाजार भोगाव : पोहाळे तर्फ बोरगाव (ता. पन्हाळा) येथील श्रमिक वाचनालयात माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून झाली. प्रारंभी दगडू माळवी, गुंडोपंत माळवी यांच्या हस्ते डॉ. कलाम व भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमांचे पूजन झाले. ग्रंथ प्रदर्शनाचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, न्यू इंग्लिश स्कूल तसेच संजावनी हायस्कूल शाळांतील तीनशे विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. पहिली ते चौथीसाठी वाचन व हस्ताक्षर, हिंदीतून मराठी अनुवाद, इंग्रजीतून मराठी अनुवाद अशा अभिनव स्पर्धा झाल्या. याशिवाय वाचनाचे महत्त्व विषयावर मराठी, इंग्रजीतून विद्यार्थ्यांची भाषणे झाली. दगडू माळवी, सुनीता कांबळे, सतीश माळवी यांनी वाचनालयाला स्वखर्चातून ग्रंथ भेट दिले. वाचनालयाचे उपाध्यक्ष आनंदा जाधव, विश्वास माळवी, दगडू माळवी, हंबीराराव पाटील, संदीप माळवी, बबन माळवी, सतीश माळवी, संदीप खवळे संयोजन केले. ग्रंथपाल भाग्यश्री माळवी, पद्मा माळवी, अभिषेक माळवी, अभिजित माळवी यांनी उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.