पोलिस वृत्त : बाजार भोगाव : पोर्ले येथे बांधकामाच्या जागेवरून मारामारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त : बाजार भोगाव :  पोर्ले येथे  बांधकामाच्या जागेवरून  मारामारी
पोलिस वृत्त : बाजार भोगाव : पोर्ले येथे बांधकामाच्या जागेवरून मारामारी

पोलिस वृत्त : बाजार भोगाव : पोर्ले येथे बांधकामाच्या जागेवरून मारामारी

sakal_logo
By

पोर्ले येथे बांधकामाच्या जागेवरून मारामारी

बाजार भोगाव,ता.४ : पोर्ले तर्फ बोरगाव (ता.पन्हाळा) येथे घरामागील रिकाम्या जागेत सुरु असलेल्या बांधकामावरून काटकर बंधूंत काठ्यांनी मारहाण झाली. याबाबत कळे पोलिसांत परस्परविरोधी फिर्याद दाखल झाल्या.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोर्ले तर्फ बोरगाव येथील बेबीताई बळीराम काटकर (वय ६५) व धोंडीराम पांडुरंग काटकर हे एकमेकांचे भाऊबंद आहेत. बेबीताईंचे दीर हरिबा रामा काटकर यांच्या घरामागील रिकाम्या जागेवरुन दोन्ही कुटुंबात वाद आहे. या जागेत धोंडीराम पांडुरंग काटकर हे बांधकाम करत होते. बांधकाम करण्यास बेबीताई व त्यांचा पुतण्या संजय हरिबा काटकर यांनी प्रतिबंध केला. यावेळी वादवादी झाली . धोंडीराम यांनी काठीने केलेल्या मारहाणीत बेबीताई व त्यांचा पुतण्या संजय जखमी झाले. याबाबत बेबीताई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धोंडीराम , त्यांची आई आकाताई, पत्नी सारीका यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. तर सारीका काटकर यांच्या फिर्यादीनुसार हरिबा काटकर, त्यांचा मुलगा संजय, रघुनाथ केरबा काटकर,उत्तम बळीराम काटकर,बेबीताई बळीराम काटकर,सुनीता रघुनाथ काटकर यांच्यविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.