
बाजार भोगाव : पिसात्री येथे अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात कळे पोलिसांना यश
अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला
बाजार भोगाव : पन्हाळा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात कळे पोलिसांना यश आले. अल्पवयीन मुलीचा विवाह तालुक्यातील एका गावातील युवकाशी होणार होता. याबाबत कळे पोलिसांना माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांनी शहानिशा करुन कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार बीट अंमलदार सहायक फौजदार महादेव खाडे यांनी तत्परतेने अल्पवयीन मुलीच्या आई वडिलांना भेटून त्यांचे समुपदेशन केले. योग्य वय झाल्यानंतरच मुलीचा विवाह करा, असा सल्ला दिला. पोलिसांच्या समुपदेशानामुळे अल्पवयीन मुलीचा होणारा विवाह होऊ घातलेला विवाह थांबला. दरम्यान, कोठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. याबाबत सहाय्यक फौजदार महादेव खाडे म्हणाले, ‘संबंधित मुलीचा युवकाशी साखरपुडा झाला होता. दुसऱ्या दिवशी विवाह होणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच मुलीच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे योग्य समुपदेशन केले.’