पोलिस वृत्त : बाजार भोगाव --- कर्जबाजारीपणाला कंटाळून पोहाळवाडीच्या युवकाची आत्महत्या

पोलिस वृत्त : बाजार भोगाव --- कर्जबाजारीपणाला कंटाळून पोहाळवाडीच्या युवकाची आत्महत्या

01447
...
कर्जबाजारीपणाला कंटाळून
पोहाळवाडीच्या युवकाची आत्महत्या

बाजार भोगाव, ता.८: कर्जबाजारीपणाला कंटाळून पोहाळवाडीतील युवकाने गळफास घेवून आत्महत्या केली. आज दुपारी ही घटना उघडकीस आली. भरत गणपती चौगले (वय ३१, रा.पोहाळवाडीपैकी चौगलेवाडी, ता.पन्हाळा) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी (ता.७) सकाळी पिसात्री येथे शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येचे प्रकरण ताजे असतानाच आज पोहाळवाडीतील युवकाने केलेल्या आत्महत्येमुळे बाजार भोगाव परिसर हादरला आहे. घटनेची नोंद कळे पोलिसांत झाली आहे.
घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, पोहाळवाडीपैकी चौगलेवाडी (ता.पन्हाळा) येथील भरत चौगले याचे आई -वडील हयात नाहीत. कामाला येतो, असे सांगून अनेकांकडून त्याने पैसै उचलले होते. त्यामुळे मागील १० वर्षांपासून त्याने गावाशी संपर्क तोडला होता. सध्या तो वाकरे (ता.करवीर) परिसरातील वीटभट्टीवर पत्नी व दीड वर्षांच्या मुलीबरोबर राहत होता.
आज दुपारी एकच्या दरम्यान पोहळवाडी ते बाजार भोगाव रस्त्याशेजारील भणगे यांच्या ''शिवंचा माळ'' शेतातील धामणीच्या झाडाला दोरीने गळफास घेवून त्याने आत्महत्या केली. पोहाळवाडीच्या पोलिस पाटील शबाना मोकाशी यांनी कळे पोलिसांत वर्दी दिली. सहाय्यक फौजदार एन.ए.चौगले, एस.के.दुर्गुळे, एस.एस.चव्हाण यांनी पंचनामा केला.
....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com