अपघात वृत्त : बाजार भोगाव : कोलिकमधील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला सर्पदंश

अपघात वृत्त : बाजार भोगाव : कोलिकमधील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला सर्पदंश

कोलिकमधील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला सर्पदंश

बाजार भोगाव, ता.१४ : कोलिकमधील ग्रामपंचायत कर्मचारी बळवंत श्रीपती कांबळे (वय ५०) यांना आज कर्तव्यावर असताना
सर्पदंश झाला. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सुधारत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कोलिक गावसाठी नवीन नळपाणी योजना मंजूर झाली आहे . या योजनेसाठीच्या जलवाहिनी सर्व्हेक्षणाचे काम कोलिकच्या जंगलात सुरु असताना आज दुपारी अडीचच्या सुमारास श्री. कांबळे यांना सर्पदंश झाला. ग्रामपंचायत प्रशासनाने त्यांना उपचारासाठी ताबडतोब कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तत्काळ उपचार सुरु झाल्याने कांबळे यांच्या जीवावरील धोका टळला असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com