बेळगाव : यात्रा

बेळगाव : यात्रा

माघ पौर्णिमेनिमित्त लाखो भक्तांनी
फुलला सौंदत्ती डोंगर
बेळगाव, ता. ५ : माघ पौर्णिमेनिमित्त लाखो भक्त सौंदत्ती येथील यल्लमा डोंगरावर दाखल झाले आहेत. त्यामुळे परिसर पूर्णपणे भरून गेला असून प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या सुविधा कमी पडत आहेत.
दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या रेणुका देवीच्या यात्रेसाठी कोल्हापूर, निपाणी आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने डोंगरावर दाखल होतात. यावेळीही बैलगाडी आणि इतर वाहनानी बेळगाव जिल्ह्यासह विविध भागातील लाखो भाविक डोंगरावर पोहोचले आहेत. रविवारी यात्रेचा मुख्य दिवस होता त्यामुळे पडल्या भरण्याचा कार्यक्रम करण्यास इतर धार्मिक कार्यक्रम करून भाविक आपल्या गावाकडे रवाना झाले आहेत. माघ पौर्णिमेला होणारी यात्रा ही वर्षातील सर्वांत मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. मात्र प्रशासनाने याच्यासाठी केलेल्या सुविधा कमी पडत आहेत, असे मत डोंगरावरील यात्रेकरुंनी व्यक्त केले आहे. सौंदत्ती यात्रेसाठी तीनशेहून अधिक बसेस डोंगरावर सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे यात्रेच्या माध्यमातून परिवहन मंडळाला देखील मोठा लाभ मिळणार आहे. मंगळवारपर्यंत डोंगरावर भाविकांची गर्दी असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com