बांबवडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांबवडे
बांबवडे

बांबवडे

sakal_logo
By

१६२०

सीसीटीव्हीमुळे गुन्हेगारीस आळा शक्य
पोलिस उपअधीक्षक साळोखे; बांबवडे बाजारपेठेत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित
बांबवडे, ता. ७ ः सीसीटीव्हीमुळे गुन्हेगारीस आळा बसेल. बांबवडे ग्रामपंचायत व व्यापारी असोसिएशनने संच देऊन सामाजिक कर्तव्याचे भान जपले आहे, असे प्रतिपादन शाहूवाडीचे पोलिस उपअधीक्षक रवींद्र साळोखे यांनी व्यक्त केले. ग्रामपंचायत व व्यापारी असोसिएशनने दीड लाखांचा सीसीटीव्ही संच पोलिस भेट दिला. ग्रामपंचायत व व्यापारी असोसिएशनने बाजापेठेत बसवलेल्या सीसीटीव्ही संचाच्या उद्‍घाटन व लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘शाहूवाडी तालुक्यात ज्या ज्या गुन्ह्यांची उकल झाली त्यामध्ये सीसीटीव्हीचा मोठा वाटा आहे. बांबवडे ग्रामपंचायत व व्यापारी असोसिएशचे सहकार्य लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्‍वाचे आहे.’’
पोलिस निरीक्षक विजय पाटील म्हणाले, ‘‘बांबवडेसह तालुक्यातील महत्त्‍वाच्या ठिकाणी निर्भया पथक २४ तास पूर्ण क्षमतेने सक्रिय आहे. जवळपास घडणाऱ्या अनुचित घटनांची माहिती द्यावी.’’
सरपंच सागर कांबळे, उपसरपंच सयाजी निकम, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब खुटाळे, माजी सरपंच विष्णू यादव यांनी मनोगत व्यक्त केले.
असोसिएशनचे उपाध्यक्ष दत्तात्रय शेळके, सचिव दत्तात्रय यादव, चंद्रप्रकाश खुटाळे-पाटील, शरद बाऊचकर, सुरेश नारकर, रोहन फाटक, मधुकर बुवा, अमर पाटील, दीपक साडविलकर उपस्थित होते.
सहायक पोलिस निरीक्षक सचिन पांढरे यांनी सूत्रसंचालन केले. राजाराम थोरात यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Bmb22b01174 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top