बांबवडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांबवडे
बांबवडे

बांबवडे

sakal_logo
By

०१६३३
बुद्ध पौर्णिमेला घ्या निसर्गानुभव!
१६ ला होणार प्राण्यांचे परीक्षण गणना; वनविभागातर्फे आयोजन
सकाळवृत्तसेवा
बांबवडे, ता. ९ ः शाहूवाडी तालुक्यासह जिल्ह्यात वन विभाग हा कार्यक्रम राबवणार असून निसर्गप्रेमी व सेवाभावी संस्थांना या रात्रीस निसर्गानुभव घेता येणार आहे. १६ मे रोजी बुद्ध पोर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात हा पारंपरिक पद्धतीने पाणवठ्याच्या ठिकाणी प्राण्यांचे परीक्षण व गणना होते.
शाहूवाडी तालुक्यात बारमाही व हंगामी असे ३५ पाणवठे आहे. त्यापैकी २६ पाणवठे हे बारमाही आहेत. यातील मोजक्याच ठिकाणी वन विभाग झाडांवर मचाणा तयार करून बैठकीची नियोजन करत आहे. याची रचना वन विभागाने ठरवलेली असून त्यानुसार दोन व्यक्तींना बसता येईल, अशी रचना असणार आहे. एका वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. आंबा, भाडळे, वरेवाडी, खोतवाडी, सावर्डेकर बुद्रुक, परखंदळे, शित्तूर वारुण, पळसवडे, जांबूर, माळगाव, खेडे, म्हाळसवडे, ऐणवाडी, माण, पेरीड, येलूर, आंबर्डे, तुरुकवाडी, कोतोली, रेठरे अशा २० गावांत २९ ठिकणाच्या पाणवठ्यापैकी काही मोजक्याच ठिकाणी मचाणाची रचना केली जाणार आहे. दिवस मावळतीच्या, मध्यरात्रीच्या व पहाटेच्या वेळी निसर्ग बदलते रुप, विविध पक्ष्‍यांचे व प्राण्यांचे आवाज पाणी पिण्यासाठी आलेला प्रत्येक प्राणी, त्यांचा अधिवास, त्यांच्या हालचाली अशा विविधांगी निसर्गाचे दर्शन घडणार आहे. मात्र रात्रभर सावधतेने बसून न बोलता न हालचाल करता निरीक्षण करावे लागणार आहे. १० मेपर्यंत इच्छुकांनी अर्ज करावेत असे आवाहन वन विभागाने केले आहे. निसर्गप्रेमी, अभ्यासक व सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, समाजसेवक प्रतिनिधी यात सहभाग घेऊ शकतात.

कोट
१० मे पर्यंत नाव नोंदणीकरुन हमीपत्र देऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. जो प्रथम दाखल होईल त्यांना प्राधान्य दिले जाईल. नोंदणीकृत व्यक्तींनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. वन विभागाच्या कार्यालयात नियमावली दिली जाईल.
- अमित भोसले, वनअधिकारी मलकापूर

Web Title: Todays Latest Marathi News Bmb22b01182 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top