
बांबवडे
रवींद्र पाटील 01649
हिंदुराव शेळके 01650
पाटील, शेळके यांची निवड
बांबवडे ः डोणोली (ता. शाहुवाडी) येथील डोणोली विकास सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे रवींद्र सखाराम पाटील तर उपाध्यक्षपदी हिंदुराव दत्तु शेळके यांची बिनविरोध निवड झाली. सत्ताधारी गटाचा पराभव करत यावेळी शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील, राष्ट्रवादीचे मानसिंगराव गायकवाड व काँग्रेसचे कर्णसिंह गायकवाड यांच्या संयुक्तिक गटाच्या आघाडीने सत्ता परिवर्तन केले. विठ्ठल पोवार यांनी नवीन आघाडी निर्माण करत त्यांच्याच राष्ट्रवादीच्या सत्ताधारी गटाला आवाहन दिले होते. यात १३ उमेदवारांना निवडून आणत त्यांना सभासदांनी विश्वास दाखवला. अरुण सदाशिव पाटील, रामचंद्र आनंत शेळके, बाजीराव महिपाती पाटील, मारुती नामदेव पाटील, रघुनाथ कृष्णा शेळके, शोभा आनंदा निकम, रेखा बाबासो पाटील, संभाजी सुराप्पा जानकर, लक्ष्मण बाबू कुंभार, बाळु तुका निकम, तर राजेंद्र यशवंत कांबळे बिनविरोध निवडून आले होते. श्रीमती ए. पी होतेकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडी पार पडल्या.
Web Title: Todays Latest Marathi News Bmb22b01189 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..