बांबवडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांबवडे
बांबवडे

बांबवडे

sakal_logo
By

विकास सेवा सोसायटी
चेअरमन, संचालकांसाठी प्रशिक्षण
बांबवडे ः शाहूवाडी तालुक्यातील सर्व विकास सेवा सोसायटींचे चेअरमन व संचालकांच्या दोन दिवसांच्या पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण वर्गास संस्था प्रतिनिधींनी उपस्थित राहावे; असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांनी केले. बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील माजी खा. उदयसिंगराव गायकवाड सह. साखर कारखाना येथे विकास सेवा सोसायटींच्या प्रतिनिधींना ता. १० व ११ अॅाक्टोबर या दिवशी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक व कोल्हापूर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन केले आहे. एमएससी बँकेचे बाळासाहेब देशमुख व प्रशांत तावडे प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. विकास अधिकारी अशोक सातपुते, निरीक्षक नंदकुमार जामदार प्रशिक्षणाचे संपर्कप्रमुख असतील.