बांबवडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांबवडे
बांबवडे

बांबवडे

sakal_logo
By

साळशीतील कामे निकृष्ट
झाल्याबाबत तक्रार
बांबवडे ः साळशी (ता. शाहूवाडी) येथील ग्रामपंचायतीची झालेली कामे निकृष्ट झाली आहेत. याबद्दलची तक्रार ग्रा. पं. सदस्य अमर पाटील यांनी गटविकास अधिकारी, शाहूवाडी यांचेकडे केली आहे.
याबाबत निवेदनात असे म्हटले आहे, १४ व १५ व्या वित्त आयोगातील कामांत गैरव्यवहार झाला असून एकाच कामावर दोनवेळा निधी खर्च केला आहे. काही कामे न होताच निधीचा दुरुपयोग केला आहे. याबाबत सरपंच संदीप पाटील म्हणाले, ‘तक्रारदार ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. त्यांनी केलेल्या चौकशी अर्जवरुन सर्व कामांची तपासणी संबंधित अधिकाऱ्यांनी केली आहे. त्यांना यात कोणताही दोष उणिवा आढळल्या नसल्याचे अहवाल दिले आहेत. तरीसुद्धा राजकीय सूडभावनेने व येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही तक्रार दिली असून यात काही तथ्य नाही.’