बांबवडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांबवडे
बांबवडे

बांबवडे

sakal_logo
By

०१७७४
बांबवडे : महामार्गावरील खड्डे भरताना सरपंच सागर कांबळे व मान्यवर.
...............

महामार्गावरील खड्डे भरत
बांबवडे सरपंचांनी वेधले लक्ष
बांबवडे ता. १ : येथे कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर पडलेले जीवघेणे खड्डे सरपंच सागर कांबळे यांनी मुजवत लक्ष वेधले. महामार्गावर खड्डे भरून घेण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करुनदेखील खड्डे भरून घेण्यास शासनाकडून दिरंगाई होत आहे. हे लक्षात आल्यानंतर स्वतः सरपंच सागर कांबळे यांनी खड्डे भरण्यास सुरूवात केली. त्यांनी सहकाऱ्यांच्या सहकार्याने महामार्गावरील खड्डे भरून घेण्यास सुरूवात केली. आज बांबवडे येथील ग्रामपंचायत, बस स्टँन्ड या परिसरातील खड्डे भरून घेतले. यात त्यांनी स्वतः दगड माती व मुरूम टाकून श्रमदान केले. महामार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाने पडलेले खड्डे भरून घेण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही. लोकांना होणारा त्रास कमी व्हावा म्हणून आम्ही स्वतः हे खड्डे भरून घेतले आहेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी ग्रा. पं. सदस्य सुरेश नारकर, सतिश कांबळे, सचिन मुडशिंगकर, श्रिकांत सिंघण, शरद निकम, राहुल निकम, शंकर परीट आदींनी श्रमदानात योगदान दिले.