
बांबवडे
लोगो ः रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्ग
-
फोटो- 71999
-
टक्केवारीच्या मुद्यावरून
भूसंपासनचे अधिकारी धारेवर
डोणोलीत पथकाकडून ग्रामस्थांना भेट
बांबवडे ता. २९ ः डोणोली (ता. शाहुवाडी) येथे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन सुरू आहे. काही लोकांच्या जमिनी कौटुंबिक वादविवादात असल्याने नुकसानभरपाई स्वीकारलेली नाही. त्यामुळे अशा लोकांचे समज गैरसमज दूर करुन नुकसानभरपाईची रक्कम स्वीकारावी यासाठी भूसंपासन विभागाकडून गावगावात भेटी सुरू आहेत.
डोणोली येथेही या पथकाने लोकांच्या भेटी घेतल्या. यावेळी टक्केवारीचा आरोप करत लोकांनी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी लोकप्रतिनिधींच्या मौनावरही बोट ठेवण्यात आले.
ग्रामस्थ अरुण पाटील, लक्ष्मण शेळके , उत्तम पाटील, तुकाराम शेळके, रंगराव पाटील, भिमराव पाटील, रवि खुटाळे, सुरेश शेळके, शामराव खोत, अर्जुन शेळके, बाजीराव पाटील, आनंदा शेळके आदी शेतकरी उपस्थित होते.