Sun, Jan 29, 2023

सुपात्रेच्या इंग्लिश स्कुलमध्ये क्रीडा स्पर्धा
सुपात्रेच्या इंग्लिश स्कुलमध्ये क्रीडा स्पर्धा
Published on : 1 January 2023, 4:20 am
सुपात्रेच्या इंग्लिश स्कुलमध्ये क्रीडा स्पर्धा
बांबवडे : विद्यार्थी दशेतच राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडतो, असे प्रतिपादन माजी आमदार संजीवनी गायकवाड यांनी केले. सुपात्रे (ता. शाहुवाडी) येथील दि न्यु इंग्लिश स्कुलमध्ये शालेय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. गायकवाड म्हणाल्या, आलिकडील काळात राजकारण बदलत असुन क्रीडाक्षेत्राकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे. ग्रामीण भागातील खेळाडू राष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी राजकीय नेत्यांनी योगदान द्यायला हवे.’’ मुख्याध्यापक संजय वास्कर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. स्पर्धेचे नियोजन संजय पाटील, आकाराम दिंडे, रवींद्र मगदुम, सागर कांबळे, संजय गवळी, दिनकर मगदुम, शारदा शेळके, शरद खुटाळे, रमेश कांबळे, रमेश जाधव यांनी केले.