
बांबवडे.. सह्यद्री
अंजनी 01958
कारवी 01956
लोथ 01957
लोगो ‘सह्याद्री’चा वैभवशाली वारसा ः भाग३
जागतिक जैवविविधतेत ‘सह्याद्री''ला अग्रस्थान
प्रमुख बारा ठिकाणांत गणना; मसाई व कास ही पाठारे महत्वाची
अमर पाटीलः सकाळ वृत्तसेवा
बांबवडे ता. १४ ः सह्याद्री पर्वत रांगात अमूल्य अशी नैसर्गिक जैवविविधता आहे. जगातील बारा महत्वाच्या जैवविविधतेच्या पर्वतापैकी एक अशी सह्याद्री पर्वताची गणना केली जाते. सह्याद्री पर्वतात ७४०२ सपुष्प तर १८७४ अपुष्प जैव वनस्पतींचा खजाना आहे. त्यामध्ये कास पठार व मसाई पठार ही पाठारे जैवविविधतेत महत्वाची आहेत. त्यामुळे ‘सह्याद्री’चे महत्व जागतिक स्तरावर अमुल्य असे आहे.
जिल्ह्यातील आंबा, गगनबावडा, राधानगरी, चंदगड, आजरा तर सांगली जिल्ह्यातील चांदोली अभयारण्यात नैसर्गिक विविध नैसर्गिक साधन संपत्ती आहे. या जंगलात मसाले, औषधी, फुले, वेली, वृक्ष, गवत, झुडपे असे अनेक वर्गीय वनस्पती आढळत आहेत. वन्यजिवांच्या अन्नसाखळीची मुख्य जबाबदारी या वनस्पतींवर आहे. या जंगलात दालचिनी, तमालपत्री, त्रिफळा, लवंग, कडिपत्ता, जायपत्ती आदी वनस्पती मोठ्या प्रमाणावर आढळतात. औषधी गुणधर्म वनस्पती आढळतात. तिनही ऋतूत विविध फुलांच्या गंधाने सह्याद्री सुगंधित व ताजातवाना असतो.
चौकट:
फुलांची वैशिष्ट्ये
लोखंडी हे अत्यंत सुगंधी फुल असून याचा गंध दूरपर्यंत पसरतो. वसंत ऋतुत बहरणारे फुल असल्याने ऐन उन्हाळ्यात त्याचा सुगंध जंगलात पसरतो. याचा आरोमा थेरपीसाठी वापर केला जातो.
कौशी व सारंगी या फुलांचा आत्तरासाठी वापर होतो.
उदगीरी, धोपेश्वर नामकरण!
जंगलात राळधुप किंवा उदाची झाडे मुबलक होती. धुप किंवा उद या नावावरून ‘धोपेश्वर'' व ‘उदगीरी’ असे नामकरण झाले. व्यापाराच्या अतिरेक व हव्यासाने ही वनस्पती नष्ट होत गेली.
लाईनास वेल
या वेलीची सूर्याच्या दिशेने वाढ होते. त्यासाठी तिला झाडाचे सहाय्य घ्यावे लागते. जंगलातील शेकडो वर्षांची जीर्ण झाड वेलींच्या ओझ्याने मोडतात आणि सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडतात. त्यामुळे नव जंगल निर्मितीचे कालचक्र सुरु राहते.
चमकणारी बुरशी (बायो लुमिनस):
पावसाळ्यात मोठमोठ्या वृक्षांवर रेडीयमसारखी प्रकाशमय ही बुरशी बहरते. काही लोकांनी या वनस्पतीला ‘संजीवनी’ भासवून विकण्यास सुरुवात केली. खोटे औषधी भासवून या वनस्पतीची तस्करी वाढली, त्यामुळे ती दुर्मिळ होत गेली.
वनस्पती नष्ट होण्याची भीती
जंगल सफारी करताना मोहक व सुंदर दिसणाऱ्या वनस्पती तोडून जवळ ठेवणे, लहान रोपटी अंगणात लावण्याच्या उद्देशाने उपटून घेऊन जाणे, औषधी वनस्पतींची तस्करी करणे, बेसुमार वृक्षतोड करणे, वनवा (आग लावणे) पेटवणे, आदींपासुन तर जास्त पर्जन्यामुळे डोंगर खचून विघटनातुन वनस्पती नष्ट होतात.
कोट
ग्लोबल वांर्मिंग, वातावरणातील बदलामुळे जंगल व जैविक विविधतेवर परिणाम होत आहे, तर पर्यटनात वाढ होणे गरजेचे आहे. पर्यटकांसह सर्वांच्यात ‘जंगल माझ वैभव'' ही भावना रूजली पाहिजे. तरच हा शाश्वत वारसा आपण पुढे नेऊ शकतो.
- प्रमोद माळी, निसर्गमित्र, आंबा.