नवलेखकांनी समाजमन जाणून लिहिते व्हावे -प्रा.खोत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवलेखकांनी समाजमन जाणून लिहिते व्हावे -प्रा.खोत
नवलेखकांनी समाजमन जाणून लिहिते व्हावे -प्रा.खोत

नवलेखकांनी समाजमन जाणून लिहिते व्हावे -प्रा.खोत

sakal_logo
By

01541
मोहरे ः अंतरीची शब्दशिल्पे काव्यसंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी मान्यवर लेखकांसमवेत कवयित्री श्वेता मोहिते.

नवलेखकांनी समाजमन जाणून
लिहिते व्हावेः प्रा.आप्पासाहेब खोत

बोरपाडळे, ता. १०: सोशल मीडियाच्या जमान्यात वाचनसंस्कृती कमी होते आहे, ही चिंतेची बाब आहे. या परिस्थितीत नवयुवक लिहिते होत आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे. त्यांनी सामाजिक समस्या अन् समाजमन साहित्यात उतरवण्याचे आवाहन ग्रामीण कथाकार प्रा. आप्पासाहेब खोत यांनी केले. ते मोहरे हायस्कूल (ता. पन्हाळा) येथे श्वेता मोहिते लिखित अंतरीची शब्दशिल्पे काव्यसंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते प्रा. शिवाजी मोहिते यांनी रेखाटलेल्या सुमारे ५० चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्‍घाटन झाले. याचा विद्यार्थी-ग्रामस्थांनी लाभ घेतला. प्रास्ताविक माजी जि. प. सदस्य प्रा. शिवाजी मोरे यांनी केले. ज्येष्ठ लेखक व समीक्षक दीपक स्वामी, लेखक दि. बा. पाटील, लेखक डॉ. श्रीकांत पाटील, प्रा. के. जी. जाधव, कवयित्री क्रांती पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन पी. व्ही. चावरे यांनी केले. सरपंच प्रा. मोहिते यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Brp22b01510 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top