
केखलेत कृषीदुताकडून जागरुकता कार्यक्रम शुभारंभ
०१५८८
केखले : येथे कृषी जागरुकता कार्यक्रम प्रारंभप्रसंगी कृषीदूत व मान्यवर.
--
केखलेत कृषी जागरुकता कार्यक्रम
बोरपाडळे : केखले (ता. पन्हाळा) येथे डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय तळसंदेतर्फे ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी-औद्योगिक कार्यानुभव" या अभियानाचा प्रारंभ झाला. शिवराज्याभिषेक सोहळयाच्या औचित्याने झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच हंबीरराव चौगुले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली केखलेसह माले, पोखले आदी परिसरातील शेतकऱ्यांना कृषिविषयक उद्बोदन होणार आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रात्यक्षिके होणार असल्याचे कृषिदूत अलंकार भोसले यांनी सांगितले. कृषिदूत विनय पाटील, अमर चौधरी, प्रतीक सोनवणे, प्रथमेश पवार, मिलिंद कांबळे यांचे सहकार्य लाभले.
01622
पुंगाव रस्त्यावर चरीमुळे धोका
राशिवडे बुद्रुक ः पुंगाव (ता. राधानगरी) येथे मुख्य रस्त्यावर मोठी चर पडल्याने येथून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. गावातील येणारी सांडपाणी या चरीतून सतत वाहत असल्याने वाहनधारकाना अंदाज येत नाही. अनेकवेळा दुचाकीस्वार यात पडून जखमीही झाले आहेत. तरीही याकडे दुर्लक्ष होत आहे. पुंगाव येथून राशिवडेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गेले अनेक दिवस ही चर पडलेली आहे. गावातून येणारे सांडपाणी खालील शेतकरी आपल्या शेतातून घालवायला तयार नाहीत त्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहते आणि धोका वाढत आहे. याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे. आता पावसाळ्यात आणखी धोका वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्या अगोदर येथील व्यवस्थित काम करणे आवश्यक आहे. लोकप्रतिनीधींची रोज ये जा या चरीतूनच होते पण याकडे दुर्लक्ष आहे.
कोतोलीत मेहंदी स्पर्धेचे आयोजन
पुनाळ : कोतोली (ता. पन्हाळा) येथील श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी येथे मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, सांस्कृतिक समिती, सहेली व्यक्तिमत्त्व विकास समिती आणि जेन्डर ऑडिट समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मेंहदी स्पर्धेचे आयोजन केले होते. यात बी.ए.भाग दोन व तीन, बारावी विज्ञान व बी.व्होक.विभागातील विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत खालील विद्यार्थिनींनी यश संपादन केले. प्रथम क्रमांक गीता कृष्णात पाटील,द्वितीय क्रमांक सानिया बाजीराव पाटील,तृतीय क्रमांक प्रतीक्षा संजय लव्हटे या विद्यार्थिनींनी मिळवला. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. मनीषा पाटील आणि श्रीमती उमा पाटील यांनी केले.
2803
सरवडे: पुस्तक प्रकाशन प्रसंगी विजयसिंह मोरे, विठ्ठलराव खोराटे, विनायक राऊत, अरविंद मानकर आदी.
"लयभारी कोल्हापुरी''चे प्रकाशन
सरवडे ः लेखक अरविंद मानकर यांच्या ‘लयभारी कोल्हापुरी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य अर्जुन कुंभार, उद्योजक विनायक राऊत, ‘गोकुळ’चे संचालक विजयसिंह मोरे, बिद्रीचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक राजेंद्र पाटील, चंद्रकांत निकाडे, अपर्णा मानकर यांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशन झाले. लेखक मानकर यांनी स्वागत केले. याप्रसंगी श्री. मोरे यांची सत्कार झाला. या वेळी श्रीकांत पाटील, अतुल कुंभार, प्राचार्य अर्जुन कुंभार, विनायक राऊत, विजयसिंह मोरे, चंद्रकांत निकाडे, महादेव इंगवले, दत्तात्रय परीट यांची भाषणे झाली. सुकुमार पाटील, बी. एन. मगदूम,पी. एस. पाटील,अशोक एरुडकर, बी. एस. पाटील, पांडुरंग काळेबेरे, नारायण आयरे, संभाजी पाटील, शामराव रेपे, सेवक शेटगे, सी. ए. पोवार, हिंदूराव पाटील, पंडित पाटील आदी उपस्थित होते. अतुल कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. जयवंतराव हावळ यांनी आभार मानले.
येळवडे पोटनिवडणुकीत दीपाली पाटील विजयी
राधानगरी : येळवडे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी आघाडीच्या दीपाली पाटील विजयी झाल्या. तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या पाच रिक्त जागांच्या पोट निवडणुकाचा कार्यक्रम घोषित झाला होता. यातील पुंगाव ग्रामपंचायतीच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीला मतदानाच्या आदल्या दिवशी विभागीय आयुक्तांनी स्थगिती दिल्याने, ती रद्द झाली. तर ढेंगेवाडी ग्रामपंचायतीच्या दोन तर शेळेवाडीच्या एका जागेसाठी उमेदवारी अर्जच दाखल झाला नाही. त्यामुळेच चार पैकी केवळ येळवडे ग्रामपंचायतीच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी काल मतदान झाले. आज तहसीलदार कचेरीत मतमोजणी झाली.
01563
अर्जुननगर ः देवचंद कॉलेज येथील प्रा. रंगराव पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करताना प्राचार्य डॉ. प्रशांत शाह यावेळी उपस्थित मान्यवर.
प्रा. रंगराव पाटील यांचा सत्कार
नानीबाई चिखली : देवचंद महाविद्यालय अर्जुननगर (ता. कागल) येथील व्यावसायिक अभ्यासक्रम कनिष्ठ विभागाकडे कार्यरत असलेले प्रा. रंगराव पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त प्राचार्य डॉ. प्रशांत शाह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्य शेषगिरी कागवाडे, अधीक्षक दत्तात्रय पाटील उपस्थित होते.
या वेळी प्राचार्य डॉ. प्रशांत शाह म्हणाले, ‘‘केवळ अभ्यासक्रम न शिकवता मुलांना प्रात्यक्षिकांद्वारे व्यावसायिक मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांमधून विविध क्षेत्रांतील यशस्वी उद्योजक घडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे पाटील हाडाचे शिक्षक होते.’’ या वेळी श्री. पाटील, पर्यवेक्षक अशोक पवार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. बी. एस. कुंभार, प्रा. सुहास न्हिवेकर, डॉ. राजकुमार वाईंगडे, प्रा. आशालता खोत, डॉ. एस. बी. यादव, डॉ. पी. वाय. पाटील आदी उपस्थित होते. प्रा. वैभव पाटील यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Brp22b01536 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..