काखे येथे शिक्षण परिषद संपन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काखे येथे शिक्षण परिषद संपन्न
काखे येथे शिक्षण परिषद संपन्न

काखे येथे शिक्षण परिषद संपन्न

sakal_logo
By

१९१६
‘बाल कल्याण’मध्ये फळे वाटप
कोल्हापूर : सहकार शिरोमणी एस. आर. पाटील यांच्या २० व्या पुण्यतिथीनिमित्त एस.आर.पाटील ट्रस्ट व रयत सेवा कृषी उद्योग संघाच्या वतीने बाल संकुल कोल्हापूर येथे फळ वाटप केले. ‘गोकुळ’चे अध्यक्ष व रयत संघाचे मार्गदर्शक विश्वास पाटील, रयत संघाचे अध्यक्ष नेमगोंडा पाटील, उपाध्यक्षा माधुरी जाधव, संचालक सुभाष चौगुले, शिवाजी देसाई, निवृत्ती पाटील, कुंडलिक पाटील, विलास पाटील, डी. एम. पाटील, आनंदराव तिवले व मॅनेजर तानाजी निगडे तसेच ट्रस्टचे संचालक उदय जाधव, चंद्रकांत पाटील, निर्मला निगडे, मारुती पाटील, अरविंद देसाई व बालकल्याण संकुलच्या पद्मजा तिवले आदी उपस्थित होते.

२३४७
गारगोटी बस स्थानकात चिखलाचे साम्राज्य
गारगोटी : येथील बस स्थानक परिसरात डांबरीकरण उखाडल्याने खड्डे पडले आहेत. परिसरात दलदल आणि चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कोट्यवधी करून नूतनीकरण केलेल्या बस स्थानकात अनेक गैरसोयी आहेत. याचा प्रवाशांना फटका बसत आहे. यामुळे एसटीच्या कारभाराविषयी प्रवासी व विद्यार्थ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. बस स्थानकाच्या छताला गळती आहेत. छताचे पाणी फलाटवर पडत आहे. बस लागणाऱ्या फलाटवर फलक लिहिले नाहीत. या मुळे प्रवाशांना गाड्यांचा शोधत फिरावे लागते. प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई केली जात नाही. या मुळे होणाऱ्या दुर्गंधीचा प्रवाशांना निमूटपणे त्रास सहन करावा लागत आहे. याकडे एस. टी. प्रशासनाने लक्ष द्यावे आणि गैरसोयी दूर कराव्यात अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

३०९६
ऋतुजा गाडगीळ यांचा सत्कार
पुनाळ : घोटवडे (ता. पन्हाळा) येथील ऋतुजा भिवाजी गाडगीळ यांचा सीए परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल ज्योतिर्लिंग हायस्कूलचे मुख्याध्यापक डी. एस. लवटे व सौ. एस. डी. लवटे यांच्या हस्ते सत्कार झाला. ज्योतिर्लिंग हायस्कूल कसबा बोरगावचे माजी विद्यार्थी अभियंता भिवाजी बापू गाडगीळ यांची ती कन्या होत. यावेळी, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.

२७२३
भोगावती महाविद्यालयात वृक्षदिंडी
शाहूनगर ः कुरूकली (ता. करवीर) येथील भोगावती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी वृक्षदिंडी काढली. प्राचार्य डॉ. डी. ए. चौगले यांच्या हस्ते दिंडीचे उद्‌घाटन झाले. विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धन व पर्यावरण रक्षणाच्या घोषणा दिल्या. पिंपळ, वड, आपटा, करंजी, फणस, चिक्कू, सागवान पाम, बदाम, गुलमोहोर आदी दोनशे वृक्षांचे रोपण केले. प्राचार्य डॉ. चौगले यांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी व प्रदूषण रोखण्यासाठी वृक्षांचे संवर्धनाची गरज असल्याचे सांगितले. प्रकल्पाधिकारी प्रा. किरण पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपप्राचार्य आर. बी. हंकारे, प्रकल्पाधिकारी प्रा. डॉ. टी. एम. चौगले, डॉ. एन. एम. पाटील, पर्यवेक्षक प्रा. आर. व्ही. गायकवाड, प्रबधंक अजित कांबळे, प्रा. संदीप चौगले, प्रा. एस. व्ही. जाधव उपस्थित होते.

६९५५
आप्पासो हिंदूराव हुजरे
दत्त नागरी पतसंस्थेचे हुजरे अध्यक्ष
घुणकी : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील दत्त नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी आप्पासाहेब हिंदूराव हुजरे यांची तर उपाध्यक्षपदी संजय पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती पी. यू. माळी होत्या. दत्त समूहाचे संस्थापक प्रभाकर शंकरराव साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्थेची २०२२-२३ ते २०२७ -२८ या कालावधीची निवडणूक बिनविरोध झाली. संचालक असे ः प्रभाकर शंकरराव साळुंखे, जगन्नाथ दत्तात्रय पाटील, राजेंद्र जयवंतराव पाटील, कृष्णात आनंदा बोरुडे, नंदकुमार दत्तात्रय मराठे, सूर्यकांत आकाराम शिर्के, भालचंद्र धोंडजी पाटील, ज्ञानदेव गणपती खाडे, अनिता अनिल सुतार, भारती दत्तात्रय जाधव.

काखे येथे शिक्षण परिषद
बोरपाडळे : सातवे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद काखे (ता. पन्हाळा) येथे झाली. अध्यक्षस्थानी बाबासाहेब सोरटे होते. मुख्याध्यापक मधुकर निकम यांनी प्रास्‍ताविक केले. या वेळी अनिल मोरे, संग्राम निकम, विश्वनाथ बोराटे, अनिल कुंभार आणि केंद्रप्रमुख मल्हारी सावंत यांनी परिषदेला उद्‌बोधित केले. पायाभूत शिक्षण व विविध उपक्रम पायाभुत चाचणी स्वरुप आदी विषयावर मार्गदर्शन झाले. विजयमाला यादव यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले.

२७४३
कबनूरमधील आंदोलनास महिलांचा पाठिंबा
कबनूर ः कबनूर नगरपरिषद व्हावी या मागणीसाठी अठराव्या दिवशी धरणे आंदोलन सुरू राहिले. कबनूर नगरपरिषद कृती समितीतर्फे देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार चौकातील दर्गा कट्टा येथे हे आंदोलन करण्यात येत आहे. आजच्या धरणे आंदोलनास माळभाग सिद्धार्थनगरमधील महिलांनी पाठिंबा दिला. धरणे आंदोलनात दत्तात्रय शिंदे, दत्तात्रय पाटील, अजित खुडे, उत्तम जाधव, रियाज चिकोडे, रवींद्र धनगर, युवराज कांबळे, विष्णू चव्हाण, फिरोज फकीर, महेश शिरोडकर आदींनी सहभाग घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Brp22b01597 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..