बोरपाडळे हॉटेल येथील पिकअप शेड दुरुस्तीच्या प्रतीक्षेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोरपाडळे हॉटेल येथील पिकअप शेड दुरुस्तीच्या प्रतीक्षेत
बोरपाडळे हॉटेल येथील पिकअप शेड दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

बोरपाडळे हॉटेल येथील पिकअप शेड दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

sakal_logo
By

B01746
बोरपाडळे ः हॉटेल येथील पिकअप शेडची दुरवस्था. (छाया ः अनिल एच. मोरे)

बोरपाडळे हॉटेल बसथांबा
दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

बोरपाडळे, ता. ३०: बोरपाडळे हॉटेल म्हणजे कोल्हापूर, बांबवडे आणि वारणानगरला जोडणारा महत्वाचा थांबा आहे. कोल्हापूर, मलकापूर, सातवे आणि कोडोलीकडून येणारे प्रवासी याठिकाणी उतरतात. त्यामुळे इथे नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. पण, येथील पिकअप शेडची दुरवस्था झाली आहे. पत्रा, खिडक्या, बाकडी याची अवस्था दयनीय आहे. शिवाय आतमध्ये कचरा , पावसाळ्यातील गळती प्रवाशांना त्रासदायक ठरत आहे.
कित्येक वर्षापासून पाऊस, ऊन अन थंडीच्या दिवसातील प्रवाशांचा आधार ठरणारी पिकअप शेड निराधार होत असल्याचे वास्तव आहे.
संबधित विभाग, सामाजिक संस्था वा तरुण मंडळानी पुढाकर घेऊन याची दुरुस्ती वा डागडुजी करण्याची गरज आहे. यासंबधी येथील ग्रामस्थ व प्रवासांमधून दुरुस्तीची मागणी होत आहे.

कोट
बोरपाडळे घाट उतरल्यानंतर रत्नागिरीकडून आल्यांनतर हा बसथांबा प्रवासांना काहीकाळ विश्रांती देतो. पण, येथील पिकअप शेड फारच नादुरुस्त आहे. त्याचे बांधकाम, रंगरंगोटी, बैठक बाकडी दुरुस्त करण्याची गरज आहे.
-गीतांजली कोळी, माजी सरपंच, बोरपाडळे

Web Title: Todays Latest Marathi News Brp22b01629 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..