दुसऱ्यादिवशी पावसाचा दणका कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुसऱ्यादिवशी पावसाचा दणका कायम
दुसऱ्यादिवशी पावसाचा दणका कायम

दुसऱ्यादिवशी पावसाचा दणका कायम

sakal_logo
By

दुसऱ्यादिवशी पावसाचा दणका कायम

कोल्हापूर ,ता. १ ः शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून परतीच्या पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी हलका, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

कापणीला आलेल्या
भाताचे नुकसान
कोवाड ः परिसरात दोन दिवसांपासून ढगांचा गडगडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. पावसामुळे ऊस, भात, भुईमूग व सोयाबीन पिकांना मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे ऊस पीक जमिनीवर कोसळले आहे, तर सोयाबीनची काढणी खोळंबली आहे. पावासाची रिपरीप सुरू झाल्याने कापणीला आलेल्या भाताच्या पिकाचे नुकसान झाले आहे. पंधरा दिवस पावसाने उघडीप दिली होती. भुईमूग व सोयाबीन काढणीची कामे जोरात सुरू होती. जून व जुलैमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे बटाटे, भुईमूग व सोयाबीन पिकाच्या वाढीला मार बसला होता. पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी या पिकांच्या काढणीच्या कामात गुंतला असताना शुक्रवारी पुन्हा पावासाने झोडपून काढले. दुपारनंतर आकाश काळवंडून आले आणि जोरदार पाऊस सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. शनिवारी दुपारी दोन वाजता पुन्हा पाऊस सुरू झाल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.


गगनबावडा, सांगशी परिसरात
ढगफुटीसदृश पाऊस
असळज : आज सायंकाळी गगनबावडा व सांगशी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. पावसाने तासभर सगळीकडे पाणीच पाणी करून टाकले. अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावर आले. विजांचा कडकडाट व धो-धो कोसळणारा पाऊस यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. पावसाने करुळ घाटातील रस्त्यावर मातीच्या ढिगारे व पावसाचे पाणी वहात आल्याने वाहऩधारकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागली.


सुगीवर पाणी फिरले
बोरपाडळे : पावसाने दुसऱ्या दिवशी दणका कायम दिल्याने सोयाबीन सुगीवर पाणी फिरले. भिजलेल्या सोयाबीनची उन्हाअभावी मळणी थांबल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे, मात्र अडसाल उसलागण, भात आणि चित्रावाणाच्या भुईमूग पिकांसाठी पाऊस लाभदायक असल्याने समाधान आहे.