शहापूरसह परिसरात शेत शिवारात कोयत्यांबरोबर ट्रॅक्टरचा आवाज घुमू लागला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहापूरसह परिसरात शेत शिवारात कोयत्यांबरोबर ट्रॅक्टरचा आवाज घुमू लागला
शहापूरसह परिसरात शेत शिवारात कोयत्यांबरोबर ट्रॅक्टरचा आवाज घुमू लागला

शहापूरसह परिसरात शेत शिवारात कोयत्यांबरोबर ट्रॅक्टरचा आवाज घुमू लागला

sakal_logo
By

शहापूरला ऊस भरणीवेळी ऊसतोड मजूर
-------------------------------
ऊस तोडणीसाठी शिवार फुलले
बोरपाडळे : ऊसतोडणी हंगाम सुरु झाला असून शहापूर, बोरपाडळे, मोहरे, काखे, माले, पोखले, जाखले, केखले आदी ऊसप्रवण क्षेत्रातील शेतशिवार तोडणीमजूर, वैरणीसाठी पशुपालक आणि ऊस वाहतूकदारांनी साऱ्यांनी शिवार फुलला आहे. फडात कोयत्यांचा खणखणाट, ट्रॅक्टरवरील टेपचा व मजुरांच्या गाण्याचा आवाज घुमू लागला आहे. ऐन थंडीत ट्रॅक्टरवरील गाणी मजुरांना ऊसभरणी, तोडणीवेळी करमणूक करत आहेत. वैरणीसाठी युवावर्गही पहाटे-पहाटे फडाचा शोध घेताना दिसत आहे. परजिल्ह्यातून आलेल्या ऊस टोळ्यांना तोडणीचे काम सुरु झाल्याने त्यांच्यातही समाधान आहे.