सुगीच्या दिवसातील हमखास येणारे,लहान मुलांचे आकर्षण - कडकलक्ष्मी अन नंदीबैल,हेळवी,दरवेशी हरवत चालले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुगीच्या दिवसातील हमखास येणारे,लहान मुलांचे आकर्षण - कडकलक्ष्मी अन नंदीबैल,हेळवी,दरवेशी हरवत चालले
सुगीच्या दिवसातील हमखास येणारे,लहान मुलांचे आकर्षण - कडकलक्ष्मी अन नंदीबैल,हेळवी,दरवेशी हरवत चालले

सुगीच्या दिवसातील हमखास येणारे,लहान मुलांचे आकर्षण - कडकलक्ष्मी अन नंदीबैल,हेळवी,दरवेशी हरवत चालले

sakal_logo
By

01918
बोरपाडळे : खेळ दाखवून उदरनिर्वाह करणारी कडकलक्ष्मी.
----------------------------

लोककलावंतांचे दर्शन होतेय दुर्मिळ
ऐन सुगीत गायब; कडकलक्ष्मी, नंदीबैल, दरवेशाची बालकांना प्रतीक्षा

अनिल एच. मोरे / सकाळ वृत्तसेवा
बोरपाडळे, ता. १ : कोरोनाकाळात अनेक कलावंताना घरी बसावे लागले.तसेच ग्रामीण भागामध्ये छोट्या-मोठ्या कला व
भटकंतीने पोट भरणाऱ्या कलाकारांचे त्याकाळात वांदे झाले होते. पण सध्या सुगीचे दिवस असूनही हे स्थानिक पातळीवर ग्रामीणभागात गल्लोगल्लीत पौराणिक वा अध्यात्मिक कला सादर करणाऱ्या लोककलाकारांनी गावाकडे पाठ फिरवली आहे.
पोतराज अर्थातच कडकलक्ष्मी, भविष्यवाणी करणारे नंदीबैल,अस्वलांचा खेळ करणारे दरवेशी, मर्कटलीलाचे मदारी, घराघरांची कुंडली वाचणारे हेळवी, हातांच्या बोटांनी नावे ओळखणारे गोंधळी-डवरी मुंबईदर्शन देणारी मुंबई फिल्म, फिरस्ती भेदिकवाले आदी लोककलाकार दरवर्षी सुगीच्या दिवसांत दारात हमखास हजेरी लावायचे. या साऱ्यांद्वारे चिमुकल्यांची करमणूक व्हायची. बालकांचे सुटीच्या दिवसांतील ते आकर्षणच होते. पण, सध्याच्या पिढीकडून या लोककला, कलाकारांना म्हणावी तितकी दाद मिळत नाही. तसेच त्यांच्या पिढ्यांनी चांगले शिक्षण घेऊन पारंपरिक भटकंती सोडून दिली. त्यामुळे वरील लोककलाकारांचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. जे काही हाताच्य बोटावर मोजण्याइतके लोककलावंत उरले आहेत त्यांना शासनाकडून विशेष निधी, अनुदान वा मानधन देण्याची गरज आहे.
------------------------
चौकट -
कडकलक्ष्मी आकर्षण
पोतराज म्हणजे देवीचा सांस्कृतिक उपासक. कडकलक्ष्मी म्हणजे वाद्याच्या तालावर नाचत भिक्षा मागणारी, उघड्या अंगावर
आसूड ओढणारी, सुया, टाचण्या खुपसून घेणारी अन्‌ लहान मुलांना गमतीने भीती दाखवणारी असते. त्यामुळे बालकांना तिचे आकर्षण असते.