बोरपाडळेत गॅस-टँकरला अपघात होऊन गॅस गळती, योग्य दक्षतेने पुढील अनर्थ टळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोरपाडळेत गॅस-टँकरला अपघात होऊन गॅस गळती, योग्य दक्षतेने पुढील अनर्थ टळला
बोरपाडळेत गॅस-टँकरला अपघात होऊन गॅस गळती, योग्य दक्षतेने पुढील अनर्थ टळला

बोरपाडळेत गॅस-टँकरला अपघात होऊन गॅस गळती, योग्य दक्षतेने पुढील अनर्थ टळला

sakal_logo
By

बोरपाडळे ः पलटी होऊन अपघात झालेला गॅस टँकर.


बोरपाडळेत गॅस टँकर उलटला
जीवितहानी नाही; गळती झाल्याने प्रशासनाची तारांबळ

बोरपाडळे, ता. २ : कोडोली ते बोरपाडळे मार्गावरील बोरपाडळे गाववेश कमानीजवळ भोपतळी भागात मंगळवारी (ता. १) रात्री जयगडहून नागपूरकडे जाणाऱ्या गॅस टँकरचा (क्रमांक जी.जे.०६ ए.एक्स ३६४२) चा अपघात होऊन पलटी झाला. जीवितहानी झाली नसली तरी टँकरच्या गॅस टाकीतून गळती झाल्याने प्रशासनासह सर्वांची तारांबळ उडाली.
गॅस टँकर भोपतळी भागात ‘यू’ आकाराच्या धोकादायक वळणावर आला
असता चालकाचा ताबा सुटून पलटी झाला. यामध्ये चालक रमेश महादेव मुंडे (वय ३२, रा. गोलाई, ता. धारणी जि. अमरावती) सीटबेल्ट लावल्याने
बचावले. मात्र, गॅस गळती झाल्याचे लक्षात येताच त्यांनी व उपस्थितांनी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने शहापूर, बोरपाडळे हॉटेल येथे रस्ता बंद केला. त्यामुळे वाहतूक मिठारवाडी, मोहरे मार्गे सुरू होती. तहसीलदार रमेश शेडगे यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनला माहिती दिली. जिल्हा व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, कोल्हापूर महापालिकचे आपत्ती मुख्य व्यवस्थापन अधिकारी
दस्तगीर मुल्ला, राज्य महामार्ग पोलिस कविता नाईक, अग्निशमन दलाचे अधिकारी यांनी योग्य ती कार्यवाही केल्याने पुढील अनर्थ टळला. घटनेची फिर्याद पोलिसपाटील प्रशांत कडवेकर यांनी दिली. बुधवारी सकाळी अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी भेट दिली. दुपारी १२ च्या सुमारास पन्हाळा, कोल्हापूरच्या अग्निशमन दलांने पाण्याचे फवारे मारले. चाकण येथील मशीनच्या साहाय्याने गॅस शिफ्टिंग रात्री उशिरापर्यंत सुरू होते. क्रेनच्या मदतीने अपघातगस्त गॅस-टँकर सरळ केल्‍यावर वाहतूक सुरळीत झाली.

कोट
सकाळी घटनास्थळापासून २५०-३०० मीटर परिसरात गॅस पसरला. प्रवण क्षेत्रातील दुकानदारांना व नागरिकांना हलवले.
-दस्तगीर मुल्ला, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, महापालिका


चौकट
धोकादायक वळणाचा
चौपदरीकरणात विचार व्हावा

येथे वेगमर्यादा पट्टे, गतिरोधक असूनही अपघाताच्या घटना घडत आहेत. चौपदरीकरणात येथील धोकादायक वळणाचा विचार केला जावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
--
चौकट
यापूर्वी येथे झालेले अपघात
२००५ आणि २००६ साली याचठिकाणी गॅसटँकरना अपघात झाला होता. २००६ मध्ये बोरपाडळे व शहापूरमधील चुली बंद ठेवल्या होत्या.