
क्रीडा स्पर्धेत बोरपाडळे शाळेचे यश
01968
बोरपाडळे ः विजेत्या संघासोबत मार्गदर्शक शिक्षक वर्ग.
बोरपाडळे शाळेचे यश
बोरपाडळे, ता. २ : सातवे केंद्रांतर्गत झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यामंदिर बोरपाडळे (ता. पन्हाळा) या शाळेने विविध क्रीडा प्रकारात यश मिळवले. लहान गटामध्ये आयुष समुद्रे याने धावणे आणि लांब उडी प्रकारात प्रथम क्रमांक पटकवला. वीणा शेटे हिने लहान गटात धावणे आणि लांब उडीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. तसेच अमृता सकटेने लांब उडीमध्ये द्वित्तीय क्रमांक पटकावला. लहान गटाने कबड्डी अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली. याच गटाने खो-खोमध्ये केंद्रात प्रथम क्रमांक पटकवत तालुकास्तर गाठला. सदर स्पर्धेमध्ये सुमारे ५० खेळाडूंनी सहभाग घेतला. क्रीडा शिक्षक अनिल मोरे, स्वाती लोहार, संजय नलवडे, प्रभावती खरात, बाबासाहेब खोत, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुदीप पाटील, सरपंच शरद जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.