
बोरपाडळेत चोरी ; तीन ठिकाणी प्रयत्न फसला
1973
बोरपाडळे ः समुद्रे यांच्या घरामागील फोडलेला दरवाजा
----------------------------
बोरपाडळेत चोरी; तीन ठिकाणी प्रयत्न फसला
बोरपाडळे, ता. २ : बोरपाडळेसह परिसरातील चोरीच्या घटना वाढत असून गुरुवारी (ता. १) रात्री उशिरा पुन्हा चोरी झाल्याने नागरिक वैतागले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री उशिरा भिवाजी बाळू कुंभार, सतीश शिवाजी समुद्रे, विकास बापुसो पाटील आणि बाबासो बाजीराव पाटील यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला. कुंभारांच्या शेतातील घरामध्ये चोरांनी घुसून पंचवीस हजारांचे कपडे नेले. २०० शर्टस्,१०० पॅंटस् आणि काही टी-शर्टसचा समावेश आहे. तसेच अन्नधान्याचीही नासधूस झाल्याचे भिवाजी कुंभार यांनी सांगितले. ख्रिश्चन वसाहतीत समुद्रे यांच्या घरामागचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र लोक जागे झाल्याने चोरांनी पळ काढला. देवाळे फाटा, विवेकनगरात पाटील यांच्या घरी चोरांनी प्रयत्न केला. कुत्रे भुंकल्याने लोक जागे झाले. त्यामुळे येथीलही प्रयत्न फसला. यापूर्वीही बोरपाडळेत दोन-तीन वेळा चोरीच्या घटना घडल्या असून गुरुवारच्या चोरीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.