पारावराची चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पारावराची चर्चा
पारावराची चर्चा

पारावराची चर्चा

sakal_logo
By

पारावराच्या गप्पा….


होऊ दे खर्च, व्हायचंय सरपंच

ग्रामपंचायत निवडणूकीत थेट सरपंव निवड आली, केद्राकडून थेट निधी ग्रामपंचायतीला मिळणार आहे. त्यामुळे कार्यकर्ते वाऱ्यावर गेले व बहुतांश सहकार सम्राटाच्या घरातीलच प्रत्येकाने गुडघ्याला बाशिंगे बांधलीत. जसजशी ग्रामपंचायत निवडणूक जवळ येऊ लागली आहे. तसतशी प्रचारातील चुरस वाढत चालली आहे. ग्रामपंचायत निवडणूक
गावातील प्रतिष्ठेचा प्रश्न बनत असल्याने साम-दाम दंड आणि काहीही देण्याची उमेदवारांची तयारी होते. लोकनियुक्त सरपंच निवडीसाठी माले, जाखले
आंबवडे आणि काखे आदि गावांमध्ये उमेदवारांकडून जय्यत तयारी सुरु आहे. खर्चाला सीमा राहीली नाहीय. याबाबत सरपंचपदाचा एखादा उमेदवार
प्रचारास आला की मतदारराजा सहज त्याला बोलून जाताना दिसतो आहे. घाबरू नका-होऊ दे खर्च, व्हायचंय सरपंच. इच्छुक उमेदवार मात्र स्मित करून पुढे होत आहे. - अनिल मोरे, बोरपाडळे.
--------------------------------------

यंदा कुणालाच मत नाय!
ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवार मतदारांना मतासाठी काय आश्वासन देईल हे सांगता येत नाही, पण या आश्वासनचा निवडणुकीनंतर उमेदवाराला विसर पडला असला तरी काही मतदारांना विसर पडत नाही, हे पुढील निवडणुकीत पुन्हा मते मागताना दिसून येते, त्यात एखाद्या ज्येष्ठ नागरीक मतदाराच्या प्रश्नासमोर उमेदवामाला चार चौघातही निरूत्तर व्हावे लागते. अंतिम टप्यात प्रचाराची रंगत वाढु लागली आहे. राधानगरी तालुक्यातील एका गावात असाच घडला किस्सा. दुध संस्थेत दुध घालण्यासाठी आलेल्या एका आजीबाईला संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी विचारले, ‘आजी मत कुणाला देणार?‘ या प्रश्नाने आजीबाईचा पारा चढला. तावातावान त्या म्हणाल्या, ‘या निवडणुकीत मी कुणालाच मत देणार नाय. गेल्या निवडणुकीत **** ह्यो प्रचाराला आल्यावर मला मत दे, दारातलं गटार बांधुन देतो म्हणुन गेलाय, निवडुन आल्यावर पाच वर्स झाली तरी तेचा पत्ताच नाय. म्हणुन मी ठरीवलय, या निवडणुकीत कुणालाच मत देणार नाय''. आजीच्या या उत्तराने बिचारा कर्मचारी माञ बुचकाळ्यात पडला. - सुहास जाधव, शाहुनगर
-------------