शरीरासाठी स्वच्छ पाण्याची गरज - डॉ. कदम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शरीरासाठी स्वच्छ पाण्याची गरज - डॉ. कदम
शरीरासाठी स्वच्छ पाण्याची गरज - डॉ. कदम

शरीरासाठी स्वच्छ पाण्याची गरज - डॉ. कदम

sakal_logo
By

02019, 2020
बोरपाडळे : प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करताना डॉ.कदम व मान्यवर

उकळलेले पाणी प्या ः डॉ. कदम
बोरपाडळे, ता. 21 : पोटातील बहुतांश आजार अस्वच्छ पाण्यापासून होतात. त्यासाठी शरीराला स्वच्छ व निर्धोक पाण्याची आवश्यकता आहे. पाण्यापासून होणाऱ्या आजारापासून दूर राहण्यासाठी उकळलेले, फिल्टर वा गाळलेले पाणी सेवन करावे. गुणवत्तापूर्ण स्वच्छ पाणी पिण्यासाठी लोकांना प्रवृत्त करावे तसेच त्यांना उदबोद्धीत करण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनिया कदम यांनी केले.
त्या बोरपाडळे, (ता. पन्हाळा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने आयोजित पाणी गुणवत्ता संनियंत्रण प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होत्या. फिल्ड वॉटर टेस्ट कीटद्वारे पाण्याची 11 प्रकारची तपासणीची माहिती व स्वच्छ पाण्याचे महत्व पर्यंवेक्षक गोपाळ पाटील प्रास्ताविकमध्ये सांगितले. वीरेंद्र काळे, एस. ए. पोतदार, एम. पी. गायकवाड आदींनी प्रत्यक्ष कीट वापरण्याचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणामध्ये मोहरे, शहापूर, काखे, बोरपाडळे, आरळे, सातवे, देवाळे, बोरिवडे, जेऊर, आपटी, बोगेवाडी, केकतवाडी, वेखंडवाडी, आमतेवाडी, पैजारवाडी आदी गावातील पाणी सनियंत्रण दुतांनी सहभाग घेतला. अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशासेविका आणि ग्रामपंचायत शिपाई असा सुमारे 75 जणांनी प्रशिक्षण उपस्थित होते. पाणी जल व्यवस्थापनच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम होत आहे. त्यास नागरिकांनी चांगला प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पर्यंवेक्षक संपत पाटील यांनी आभार मानले.