Sat, June 10, 2023

बोरपाडळे प्राथमिक आरोग्य केंद्रात जन औषधदिन साजरा
बोरपाडळे प्राथमिक आरोग्य केंद्रात जन औषधदिन साजरा
Published on : 9 March 2023, 3:26 am
02189
बोरपाडळे प्राथमिक आरोग्य
केंद्रात जन औषध दिन
बोरपाडळे : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ६ मार्चला जनऔषध दिन झाला. सरपंच शरद जाधव, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुदीप पाटील आदींच्या उपस्थितीत गरजू रुग्णांना मोफत औषधे वाटप करण्यात आली. पर्यवेक्षक गोपाळ पाटील यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षिका जयश्री जाधव यांनी स्वागत केले. सरकारी दवाखान्यात मिळणारी औषधे चांगल्या गुणवत्तेची असतात. त्यावर विश्वास ठेवून मोफत सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनिया कदम यांनी केले. यावेळी श्रीकांत कुंभार, वीरेंद्र काळे, अनिल मोरे आदींचे सहकार्य लाभले. पर्यवेक्षक संपत पाटील यांनी आभार मानले.