डॉ. सविता पाटील यांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. सविता पाटील यांचा गौरव
डॉ. सविता पाटील यांचा गौरव

डॉ. सविता पाटील यांचा गौरव

sakal_logo
By

02209
मोहरे : डॉ. सविता पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

डॉ. सविता पाटील यांचा गौरव
बोरपाडळे : शहापूर (ता. पन्हाळा) येथील डॉ. सविता कृष्णात पाटील यांना मोहरे हायस्कुल, कै. सर्जेराव मोरे ज्यूनिअर कॉलेज आणि स्वामी विवेकानंद विद्या मंदिर मोहरे (ता. पन्हाळा) येथे झालेल्या कार्यक्रमात आदर्श महिला पुरस्काराने गौरव करण्यात आले. डॉ. पाटील यांनी कोरोनाकाळातील केलेली रुग्णांची सेवा, पती डॉ. कृष्णात यांच्या अपघातसमयी दाखवलेली प्रसंगावधानता पाहून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी सरस्वती शिक्षण मंडळाचे संस्थाध्यक्ष प्रा. शिवाजी मोहिते, संस्थासचिव प्रा. शिवाजी मोरे, व्याख्यात्या शीतल बसरे, राहुल शेळके उपस्थित होते. लतिका मोहिते यांनी प्रास्ताविक केले. सविता डोंगरे यांनी आभार मानले. मुख्याध्यापक व शिक्षक वर्गाचे सहकार्य लाभले.