Sat, June 3, 2023

मोहरे शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण
मोहरे शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण
Published on : 24 March 2023, 3:44 am
02215
मोहरे शाळेत गुणवंतांचा गौरव
बोरपाडळे : विद्यामंदिर मोहरे (ता. पन्हाळा) प्राथमिक शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ झाला. वर्षभर उपक्रमामध्ये तसेच विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्याना गौरविले. नूतन सरपंच आप्पासो उर्फ प्रशांत शेळके, उपसरपंच प्रदीप डोईफोडे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष मोहन शेळके, राम नलवडे आदि मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार झाला. मुख्याध्यापक संभाजी बांदल यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच दिलीप भोसले होते. यावेळी प्रकाश सकटे, पंडित नलवडे, नामदेव कोरवी, रमेश जगदाळे, प्रवीण जाधव, मेघा पाटील, पूनम शेळके, पल्लवी शेळके, नंदा एडके, अलका हिरवे, रिटाश्री मोहिते आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन शीतल जगदाळे यांनी, दत्तात्रय सोनटक्के यांनी आभार मानले.