
काखे येथे बक्षीस वितरण उत्साहात
02222
काखेत बक्षीस वितरण उत्साहात
बोरपाडळे : श्री वारणामाई फाउंडेशन काखेचे कार्य उत्कृष्ट असून तसेच समाजकल्याणासाठी महत्वाचे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांनी केले. ते काखे (ता. पन्हाळा) येथे श्री वारणामाई फाउंडेशन आयोजित बक्षीस वितरण आणि महिलांसाठी मनोरंजनात्मक खेळाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. पैठणी जिंकणाऱ्या महिला - प्रथम क्रमांक मंगल संभाजी कदम, द्वितीय क्रमांक राणी रामचंद्र सूर्यवंशी आणि तृतीय क्रमांक माधुरी दीपक पाटील यांना मिळाला. स्पर्धेतील विजेत्यांना माजी बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, संस्थापक निवास खामकर, अध्यक्ष बाजीराव खामकर आदींच्या हस्ते बक्षिसे वाटप झाली. सदस्य महादेव कदम, उपसरपंच विजय पाटील, नीलम पाटील उपस्थित होते. प्रवीणा पाटील यांनी सूत्रसंचालन, राहुल खामकर प्रास्ताविक, गौरी पवार यांनी स्वागत केले. सुनीता सुतार यांनी आभार मांडले.