Sun, October 1, 2023

बोरपाडळे शाळेत केंद्रस्तरीय शाळा पूर्वतयारी प्रशिक्षण
बोरपाडळे शाळेत केंद्रस्तरीय शाळा पूर्वतयारी प्रशिक्षण
Published on : 22 April 2023, 2:04 am
02291
बोरपाडळे शाळेत केंद्रस्तरीय शाळा पूर्वतयारी प्रशिक्षण
बोरपाडळे : सातवे केंद्रस्तरीय शाळा पूर्वतयारी प्रशिक्षण येथील विद्यामंदिर बोरपाडळे शाळेत झाले. अनिल मोरे यांनी प्रास्ताविक केले. केंद्रप्रमुख मल्हारी सावंत, केंद्र मुख्याध्यापिका अस्मिता सूर्यवंशी, सुरेश गोरड, प्रकाश परीट यांनी प्रशिक्षणास मार्गदर्शन केले. नवागतांना वाजत-गाजत, सजवत आणले. पहिले पाऊल उपक्रमांतर्गत विविध खेळ, दोरी उडया, मिरवणूक आदी कार्यक्रम झाले. सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक आणि पालकांची उपस्थिती होती. मुख्याध्यापक बाबासाहेब सोरटे, संजय नलवडे, बाबासाहेब खोत, शशिकांत कोडोले, प्रभावती खरात, स्वाती लोहार आदींचे सहकार्य लाभले.