मोहरेत शंभूजयंतीनिमित्त रक्तदान व आरोग्य शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोहरेत शंभूजयंतीनिमित्त रक्तदान व आरोग्य शिबीर
मोहरेत शंभूजयंतीनिमित्त रक्तदान व आरोग्य शिबीर

मोहरेत शंभूजयंतीनिमित्त रक्तदान व आरोग्य शिबीर

sakal_logo
By

02345
मोहरेत शंभूजयंतीनिमित्त
रक्तदान व आरोग्य शिबिर

बोरपाडळे, ता. १२ : मोहरे (ता. पन्हाळा) येथे गुरुवारी (ता. ११) पासून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची ‘आम्ही मोहरेकर ः एक गाव- एक शंभूजयंती’ विविध उपक्रमांनी साजरी होत आहे. गुरुवारी कोडोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांच्या प्रमुख उपस्थितीत जन्मसोहळा २०२३ चे उद्घाटन करत शुभेच्छा दिल्या. संध्याकाळी पारंपरिक लोकगीत, लोकनृत्य आणि ग्रामीण रीतीरीवाजावर आधारित ‘गाथा महाराष्ट्राची’ सांस्कृतिक कार्यक्रम झाला. याचा मोहरेसह शहापूर, माले, काखे, सातवे, मिठारवाडीतील रसिकांनी आस्वाद घेतला. शुक्रवारी (ता. १२) ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवालयात रक्तदान शिबिर झाले. यामध्ये स्वयंस्फूर्तीने पन्नास तरुणांनी रक्तदान केले. कोल्हापूर संजीवनी ब्लड बँकेचे तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. सनराईज हॉस्पिटलतर्फे झालेल्या आरोग्य शिबिरात १२० जणांनी तर प्राथमिक आरोग्यवर्धिनीच्या प्रयोगशाळेने मोफत रक्ततपासणीत ४० जणांनी लाभ घेतला. डॉ. गडकर आय केअर हॉस्पिटल कोल्हापूरमार्फत आयोजित डोळे तपासणीमध्ये ६५ जणांनी भाग घेतला.