बोरपाडळे ते कोडोली मार्गावर अपघाती खड्डे

बोरपाडळे ते कोडोली मार्गावर अपघाती खड्डे

02347
बोरपाडळे ः शहापूरजवळील स्मशानभूमीनजीक पडलेले खड्डे.
-----------------------
बोरपाडळे-कोडोली मार्गावर खड्डे
बोरपाडळे, ता. १३ : बोरपाडळे ते कोडोली मार्गावर बऱ्याच ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना त्रास होत आहे. कोडोली रस्त्यावरील शहापूरजवळील कृषी सेवा केंद्रालगत, बझारसमोर आणि निंबाळकर शेती भागात छोटे-मोठे खड्डे पडले आहेत. यामध्ये कृषी सेवालगतचा खड्डा फारच धोकादायक बनत आहे. येथील रस्ता आरल्याने खड्डा आणखीन धोकादायक ठरला आहे. तसेच बोरपाडळे येथील गाव कमानीजवळ वळणावरील खड्डे धोकादायक अवस्थेत दिसत आहेत. येथे रस्त्याच्या बाजूला निखळून पडलेली खडी हमखास अपघातास निमंत्रण देताना दिसत आहे. शहापूर-बोरपाडळेदरम्यान चौगुले वस्तीजवळचे खड्डे वाहनधारकांना त्रासदायक ठरत आहेत. याठिकाणी काही अपघातही झाले आहेत. संबधित विभागाने लक्ष देऊन खड्डे बुजवण्याची मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com