
बोरपाडळेत श्री बाळूमामा मंदिराचा कलशारोहण सोहळा उत्साहात
02359
बोरपाडळे : श्री बाळूमामा मूर्तीच्या मिरवणूकित जेसीबीतुन भंडाऱ्याची उधळण करताना भक्त.
बोरपाडळेत श्री बाळूमामा मंदिराचा
कलशारोहण सोहळा उत्साहात
बोरपाडळे : येथील श्री बाळूमामा मंदिराचा कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा भक्तिमय वातावरणात झाला. मिरवणुकीसह मंदिर वास्तुशांती समारंभात लोकोत्सव म्हणून सहभागी होत ग्रामस्थांसह परिसरातील हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. कृष्णात डोणे यांच्याहस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ओम श्री चैतन्य गुरू माऊली यांच्या हस्ते कलशारोहण सोहळा झाला. तत्पूर्वी गावातील प्रमुख रस्त्याच्या दोन्ही बाजूला आकर्षक रांगोळी, ढोल कैताळाचा निनाद, फटाक्यांच्या आतषबाजी व जेसीबीमधून भंडाऱ्याची उधळण करत मूर्ती व कलशाची रथातून मिरवणूक काढण्यात आली. धार्मिक विधीसह श्री बाळूमामा मूर्ती पूजन, महाआरती झाली. रात्री दिपोत्सव व धनगरी ओव्या गायनाचे कार्यक्रम झाले. सोहळ्यात अंबील-घुगऱ्या गारव्यासह महिला सहभागी झाल्या होत्या. परिसरातील अनेक भाविकांनी महाप्रसादाचा व श्री. दर्शनाचा लाभ घेतला. या वेळी मंदिर आकर्षण विद्युतरोषणाईने सजवण्यात आले होते. सोहळ्यास पांडुरंग बंडगर, पिंटू माने, उद्योजक राहुल सावंत, तात्या दुर्गाडे, सरपंच शरद जाधव, सर्व ग्रामपचायत सदस्य, मंदिर समिती व भक्त उपस्थित होते.