बोरपाडळे परिसरातील डोंगर भागातील ऊस पिके करपू लागली, कडक उन्हाचा परिणाम

बोरपाडळे परिसरातील डोंगर भागातील ऊस पिके करपू लागली, कडक उन्हाचा परिणाम

काखे फाटाः येथील खंडोबा मंदिरासमोरील करपलेले ऊसपीक

...

बोरपाडळे परिसरातील डोंगर
भागातील ऊस पिके करपू लागली

बोरपाडळे,ता. २४: बोरपाडळेसह मोहरे, शहापूर, माले, काखे, पोखले, केखले आदी गावांमधील ऊस पिकांना कडक उन्हाचा फटका बसला असून काही ठिकाणी ऊस पिकांनी नांगी टाकल्याचे चित्र आहे. पाण्याअभावी पीक अक्षरशः करपल्याचे चित्र आहे. ऐन उन्हाळ्यात विहिरी व कुपनलिकांची पाणी पातळी कमी झाल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची रात्रंदिवस चांगलीच धावपळ होत आहे.
उन्हाच्या तीव्रतेचा माळरानावरील ऊस पिकावर खूप परिणाम झाला आहे. शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी पाणी पुरवठा संस्थेचे पाणी पाळी नियोजन फसलेले दिसत आहे. काही ठिकाणी पाणी मागणीसाठी पाटकऱ्यांबरोबर वाद होताना दिसत आहेत. सुकलेल्या पिकांना सहकारी पाणी पुरवठा संस्था पाणी देण्यावर भर देत असल्या तरी त्यामुळे इतर क्षेत्रावर त्याचा परिणाम होत आहे. नेमकी वळवाच्या पावसाने या भागात पाठ फिरवल्याने वाळलेल्या पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे.
...

‘ नेहमीपेक्षा यावर्षी कडक उन्हाळा आहे. सध्याच्या उन्हात माळरानासाठी आठ दिवसाला पाण्याची गरज भासते. परंतु तसा फेर येत नसल्याने पिके करपून वाळल्याचे दिसत आहे.

पोपट नलवडे, शेतकरी, शहापूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com