
पुंगावला महिला मेळावा
01552
पुंगावला महिला मेळावा
राशिवडे बुद्रुक ः बचत गटांसाठी शासन विविध योजना राबवत आहे. कमी व्याजदरात कर्जपुरवठाही केला जातो. याचा लाभ घेऊन महिलांनी गावचा विकास करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पांडुरंग भांदिगरे यांनी केले. पुंगाव (ता. राधानगरी) येथे राजर्षी शाहू कृतज्ञता पर्वानिमित्त आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. आलाटवाडी येथील बचत गटाच्या महिलांनी विविध खेळ केले. राधानगरीचे पोलिस निरीक्षक नजीर खान व कृष्णात यादव यांनी मुलींना संस्कारक्षम बनवा, त्यांची मैत्रीण बनून त्यांना योग्य मार्गदर्शन करा, असे सांगितले. गजानन भोसले यांनी बचत गटाचे फायदे सांगितले. प्रल्हाद शिंदे यांनी बॅंकांकडून मिळणाऱ्या कर्जाची माहिती दिली. मृणालिनी भस्मे यांनी मार्गदर्शन केले. ग्रामसेवक एस. टी. सोनवणे, तंटामुक्त अध्यक्ष अशोक पोवार, तलाठी विकास येरूडकर, विजय भांदिगरे, रूपाली पाटील, रेश्मा येरूडकर, बॅंक सखी वेदिका नीळकंठ, स्वप्नाली पाटील उपस्थित होते. सागर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. रूपाली पाटील यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Bvt22b00471 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..