कौलव येथे बैलगाडी शर्यती फोटोसह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कौलव येथे बैलगाडी शर्यती फोटोसह
कौलव येथे बैलगाडी शर्यती फोटोसह

कौलव येथे बैलगाडी शर्यती फोटोसह

sakal_logo
By

01635

सूरज पाटील यांची बैलजोडी प्रथम
शाहूनगर, ता. १२ ः कौलव (ता. राधानगरी) येथे (कै.) बाळासाहेब कृ. पाटील-कौलवकर यांच्या ३१ व्या पुण्यतिथीनिमित संयोजकांनी घेतलेल्या जनरल बैलगाडी शर्यतीत सूरज पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवून तीन फूटी ढाल मिळवली; तर जनरल बैल घोडा शर्यतीत राशिवडेच्या गोट्या पाटील यांच्या गाडीने प्रथम क्रमांक मिळवून पाच फुटी ढाल मिळविली.
शर्यतीचा निकाल ः बैलगाडीत अनुक्रमे नारायण पाटील, पंकज गुरव यांच्या गाड्यांना दोन फुटी ढाल, एक फुटी ढाल बक्षीस देण्यात आले. बैलघोडागाडीत दिलीप वाडकर यांच्या गाडीने द्वितीय क्रमांक मिळवून तीन फुटी ढाल मिळवली; तर तिसरा क्रमांक केरबा पाटील आणि महादेव जाधव यांना विभागून देण्यात आला. शर्यतीचे उद्‍घाटन सुरेश कुराडे, शंकर पाटील, उदयसिंह पाटील, रविश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, बोंद्रे बॅंकेचे अध्यक्ष राजेश पाटील याच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Bvt22b00497 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top