पुंगावात घरावर झाड पडून प्रापंचिक साहित्याचे नुकसान फोटोसह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुंगावात घरावर झाड पडून प्रापंचिक साहित्याचे नुकसान फोटोसह
पुंगावात घरावर झाड पडून प्रापंचिक साहित्याचे नुकसान फोटोसह

पुंगावात घरावर झाड पडून प्रापंचिक साहित्याचे नुकसान फोटोसह

sakal_logo
By

02195
बावडा शिये रस्ता बंद
शिये : शिये-कसबा बावडा मार्गावरील वाहतूक शिरोली एमआयडीसी पोलिसांनी बॅरिकेड लावून बंद केली. पंचगंगा नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढत आहे. यामुळे शिये-कसबा बावडा मार्गावर दीड फुटांपर्यंत पाणी आले आहे. पाणी वाढत असताना वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक ठरू शकते. या कारणास्तव दुपारी दीडच्या सुमारास शिये येथील श्री हनुमाननगर येथे पोलिसांनी बॅरिकेड लावून मार्ग वाहतुकीसाठी बंद केला. वाहतूक पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वळविली. यामुळे कामगार व कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. शिये नदी पुलापर्यंत येऊन अनेकांना मागे वळावे लागले.


पडझड झालेल्या घराची पाहणी
गगनबावडा ः रेव्याचीवाडी येथील अक्काताई तुकाराम चौकेकर यांच्या घराची भिंत पावसामुळे पडली. ''सकाळ’ने आजच बातमी दिली होती. तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांनी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. सरपंच भास्कर माने, उपसरपंच उपसरपंच आनंदराव गायकवाड, सदस्य कृष्णा पाटील, ग्रामसेवक सुरेश जाधव उपस्थित होते.

01474
उत्साळी येथे घराची भिंत कोसळली
चंदगड : उत्साळी ( ता चंदगड ) येथे रामा बाबाजी चौगुले यांच्या राहत्या घराची भिंत पावसाने कोसळली. सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले. पावसामुएळे ठिकठिकाणी घरांच्या पडझडी होत आहेत. आज सकाळी दहाच्या सुमारास रामा चौगुले यांच्या घराची भिंत कोसळली. यामध्ये या घराचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. प्रशासनाने याचा त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.

१७६१
पुंगावात झाड कोसळून नुकसान
राशिवडे बुद्रुक ः वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने पुंगाव (ता. राधानगरी) येथील घरावर झाड पडून प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले. येथील शांताबाई विलास पोवार यांच्या राहत्या घराच्या मागील बाजूच्या खोलीवर परसातील चाफ्याचे मोठे झाड मध्यरात्री उन्मळून पडले. सुदैवाने तिथे कुणी झोपलेले नव्हते त्यामुळे अनर्थ टळला. मात्र आतच असलेल्या शौचालयाची भिंत पडून नुकसान झाले. खोलीतील प्रापंचिक साहित्याचेही नुकसान झाले. पडलेल्या खोलीला लागूनच स्वयंपाकघर असल्याने पावसाचे पाणी घरात येत होते.

२४६२
देसाईवाडीत घराची भिंत कोसळली
माजगाव ः मुसळधार पावसाने पन्हाळा तालुक्यातील बोरगाव पैकी देसाईवाडी येथील तुकाराम गुंडा संकपाळ यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली. एक लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. प्रांपचिक साहित्य व धान्याचे देखील नुकसान झाले आहे. उपसरपंच सागर संकपाळ, मंडल अधिकारी बी. एस. खोत यांनी यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.

२६३२
आंबर्डेत घरावर झाड कोसळले
कळे : आंबर्डे (ता. पन्हाळा) येथे झाड पडून संभाजी नानू पाटील यांचे राहते घर व जनावरांचा गोठा उद्‌ध्वस्त झाला. धामणी खोऱ्यात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वारा सुरू आहे. सततचा पाऊस व पुरामुळे हा भाग पूर्णतः बंद झाला आहे. आंबर्डे येथील संभाजी पाटील यांच्या राहत्या घरावर झाड व बांबूचे बेट पडले. छत व भिंती ढासळल्या. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. बुधवारी रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली.

२६३०
कळेत वादळी वाऱ्याने छप्पर उडाले
कळे : येथील व्यापारी अशोक शंकर जाधव यांच्या घराचे वादळी वाऱ्याने रात्री छप्पर उडाले. दुकानातील माल भिजून नुकसान झाले. छताचे व मालाचे मिळून सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले. अशोक जाधव यांचे कळे येथे आंबेडकर मार्गावर राहते घर व किराणा दुकान आहे. त्यांच्या पहिल्या मजल्यावर भाडेकरू राहतात. रात्री जोरदार वारे सुटले होते. दरम्यान, तीनच्या सुमारास त्यांच्या घराचे सिमेंट पत्रे उडाले. भाडेकरूंनी दुसऱ्या खोलीत आश्रय घेतला. पाण्याने तळमजल्यावर गोडावूनमध्ये असलेला माल भिजला. तलाठी संदीप कांबळे यांनी पंचनामा केला.

Web Title: Todays Latest Marathi News Bvt22b00515 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..