सर्व्हर डाऊन..मशिनला रेंज नाही.. नागरिक त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्व्हर डाऊन..मशिनला रेंज नाही.. नागरिक त्रस्त
सर्व्हर डाऊन..मशिनला रेंज नाही.. नागरिक त्रस्त

सर्व्हर डाऊन..मशिनला रेंज नाही.. नागरिक त्रस्त

sakal_logo
By

01957
पुंगाव : येथे स्वस्त धान्य दुकानच्या दारात रेंजची वाट पाहत धान्य खरेदीसाठी झालेली गर्दी. (राजू कुलकर्णी ः सकाळ छायाचित्रसेवा)
.............

राधानगरीत रेशनचा सर्व्हर डाऊन
राशिवडे बुद्रुक : सर्व्हर डाऊन..पाॅज मशिनला रेंज नाही यामुळे स्वस्त धान्य दुकानाच्या दारात तासन्‌तास नागरिकांना थांबावे लागते. कधी रेंज मिळेल त्यावेळी धान्य मिळते. राधानगरी तालुक्यातील बहुतांश गावांत ही स्थिती आहे. स्वस्त धान्य दुकानात प्रत्येक महिन्याला गहू, तांदूळ येतो. विकत आणि मोफत असे वाटप सुरू असते. सर्व्हर डाऊन तांत्रिक बाबींमुळे कुटूंबातील व्यक्तींचा थम लवकर होत नाही. परिणामी नागरिकांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत रेशन दुकानांच्या दारात मशिनला रेंज येईपर्यंत थांबावे लागते. संध्याकाळी रेंज चांगली मिळते म्हणून दुकानदार नागरिकांना संध्याकाळी येण्यासाठी सांगतात. पुंगावला तर हे नागरिकांच्या अंगवळणी पडले आहे. धान्य आले की सर्व्हर सुरू होईपर्यंत नागरिक गर्दी करून थांबलेले असतात.