गुडाळेश्वर पण संस्था भोगावती शाखा वर्धापन दिन फोटो सह फोटो नं 1993 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुडाळेश्वर पण संस्था भोगावती शाखा वर्धापन दिन फोटो सह फोटो नं 1993
गुडाळेश्वर पण संस्था भोगावती शाखा वर्धापन दिन फोटो सह फोटो नं 1993

गुडाळेश्वर पण संस्था भोगावती शाखा वर्धापन दिन फोटो सह फोटो नं 1993

sakal_logo
By

01993

गुडाळेश्‍वर पतसंस्थेचा भोगावती शाखेचा चौथा वर्धापन
भोगावती, ता. १७ ः गुडाळेश्‍वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या येथील शाखेचा चौथा वर्धापन दिन झाला. भोगावती परिसरातील व्यापारी, वाहनधारक, सभासद ऊसतोड मजूर, ठेवीदार, हितचिंतकांनी संस्थेच्या कार्यालयात येऊन शुभेच्छा दिल्या. गुडाळेश्वर उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष व भोगावती साखर कारखान्याचे संचालक ए. डी. पाटील पाटील, विद्यमान अध्यक्ष व माजी सरपंच अभिजीत पाटील, माजी अध्यक्ष अनंत तेली, मुख्य शाखा सचिव डी. जी. पाटील , भोगावती शाखा सचिव विठ्ठल पाटील यांनी शुभेच्छा स्वीकारल्या
यावेळी डॉ. आनंदा माळवी हिंदुराव पाटील, दत्तात्रय पाटील, पांडुरंग जाधव, ईश्वरा पाटील, दीपक चरापले, वैशाली डोंगळे उपस्थित होते. शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये बाळासाहेब पाटील ,सुहास पाटील , एम. बी. पाटील व्यापारी संघटना, वडाप संघटना आदींनी गर्दी केली होती. यावेळी ए. डी. पाटील म्हणाले, ‘सभासदांच्या विश्वासावर भोगावती शाखा चांगल्या पद्धतीने वाटचाल करीत आहे. चौथ्या वर्धापन दिनापर्यंत १७ कोटी ७० लाखांच्या ठेवी आल्या असून १४ कोटी १२ लाख रुपयांची कर्जे दिली. ५ कोटी ७४ लाख गुंतवणूक असून ११ लाख २० हजार रुपयांचा नफा झाला. मनोज पाटील यांनी आभार मानले.