बलशाली युवा ह्रदय संमेलन फोटोसह बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बलशाली युवा ह्रदय संमेलन फोटोसह बातमी
बलशाली युवा ह्रदय संमेलन फोटोसह बातमी

बलशाली युवा ह्रदय संमेलन फोटोसह बातमी

sakal_logo
By

फोटो
...

स्वजाणिवेतून उत्तुंग झेप घ्या
---
इंद्रजित देशमुख; भोगावती महाविद्यालयात बलशाली युवा हृदय संमेलन
शाहूनगर, ता. २८ ः आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भविष्याच्या संभावना असतात. भविष्य ठरविण्याचा हाच काळ असतो. आपल्यात काय सामर्थ्य दडलेय, याचा शोध घेऊन युवकांनी आपले ध्येय ठरविले पाहिजे. यातूनच स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव होते. या जाणिवेतूनच आपल्याला उत्तुंग झेप घ्यायची आहे. सामान्यातून असामान्य बनायचे आहे, असे प्रतिपादन शिवम आध्यात्मिक प्रतिष्ठान, घारेवाडीचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांनी केले. भोगावती महाविद्यालयात झालेल्या बलशाली युवा हृदय संमेलनात ते बोलत होते.
भोगावती शिक्षणप्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंग हुजरे यांच्या हस्ते दीपप्रजवलनाने संमेलनाचे उद्‌घाटन झाले. के. द. पाटील यांनी स्वागत केले. आनंदा शिंदे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, संचालक बबन पाटील, मच्छिंद्रनाथ पाटील, सरदार पाटील, पी. एस. पाटील, प्राचार्य डॉ. डी. ए. चौगले, उपप्राचार्य आर. बी. हंकारे, प्रा. अनिल पाटील, प्रा. डॉ. संजय साळोखे, विजय पाटील उपस्थित होते.
दुसऱ्या सत्रात राधानगरीच्या पोलिस उपनिरीक्षक अनुराधा पाटील यांनी मुलींना सुरक्षितेविषयी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, की आपण सेल्फीस्ट झालोय. सायबर गुन्हेगारी आपल्यापासूनच सुरू होते. आई-वडिलांच्या काबाडकष्टाची जाणीव ठेवून मुलींनी वागले पाहिजे. अभय भंडारी यांनी ‘मनुष्याचे राष्ट्रीय चारित्र्य आणि समाज’ यातून वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा, कामाचे आकलन, सामाजिक उत्तदायित्व यातून युवकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की मनुष्याने सतत प्रयोगशील राहिले पाहिजे. जे काम करीत असाल ते सर्वोत्तम करा. गुणवत्तेच्या बाबतीत स्वार्थी व्हा.

डॉ. जालंदर पाटील यांनी खोट्या देखाव्याला युवकांनी बळी जाऊ नये, असे सांगितले. संमेलनाला राधानगरी, करवीर तालुक्यांतून विद्यार्थ्यांसह साधकांनी गर्दी केली होती. दत्तात्रय पाटील यांच्या गायनाने संमेलनाला रंगत चढली. प्रा. पवन पाटील, आनंदा शिंदे, सचिन डोंगळे, प्रदीप पाटील, एम. वाय. पाटील, युवराज जाधव, करण चव्हाण, किशोर पाटील, धनाजी पाटील, यश पाटील, प्रा. किरण पाटील आदींनी संयोजन केले. संभाजी यादव यांनी सूत्रसंचालन केले. दिगंबर टिपुगडे यांनी आभार मानले.