शिरगाव महिला दिनानिमित्त हिमोग्लोबिन तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरगाव महिला दिनानिमित्त हिमोग्लोबिन तपासणी
शिरगाव महिला दिनानिमित्त हिमोग्लोबिन तपासणी

शिरगाव महिला दिनानिमित्त हिमोग्लोबिन तपासणी

sakal_logo
By

02191
शिरगावला हिमोग्लोबिन तपासणी
शिरगाव ः आरोग्याची काळजी घेवून सशक्त बनण्यासाठी महिलांनी सकस आहार घ्यावा, असे आवाहन प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी संदीप प्रधान यांनी केले. येथील ग्रा.पं.तर्फे हिमोग्लोबिन तपासणी शिबिरात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच संदीप पाटील होते. मुक्ताबाई व्हरकट यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व झाशीची राणी यांच्या प्रतिमांचे पूजन करून सुरवात केली. ग्रामसेवक अशोक भांदिगरे यांनी स्वागत, सदस्य मधुकर किरुळकर यांनी प्रास्ताविक केले. आरोग्यसेवक हरिदास पोवार, आशा सारिका फिरिंगे, संगीता गुरव, मीनाज जमादार, सविता कलिकते यांनी हिमोग्लोबीन तपासणी केली. महिलांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन सरपंच संदीप पाटील यांनी केले. उपसरपंच संदीप पाटील, सदस्य अंकुश गुरव, अंकुश चांदणे, लक्ष्मण चरापले, सदस्या राजश्री पोवार, लता कलिकते, साधना पाटील, प्रणिता बरगे, कमल पाटील, आक्काताई कांबळे, शांताबाई गायकवाड, अंगणवाडीसेविका, मदतनीस, महिला उपस्थित होत्या. सुरेश गौड यांनी आभार मानले.