टू ४ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टू ४
टू ४

टू ४

sakal_logo
By

02244

शिरगावला ‘हर घर...’अंतर्गत
क्षमता बांधणी प्रशिक्षण शिबिर

शिरगाव, ता. २४ ः जलस्त्रोतातील पाण्याची कमतरता, भूगर्भातील पाणीपातळी, सांडपाण्यामुळे नदीप्रदूषण, शोष खड्ड्यांचा प्रश्न, उत्खनन यामुळे दिवसेंदिवस पाणी पातळी कमी होत आहे. भविष्यात स्वच्छ, शुद्ध व निर्जंतुक पाण्यासाठी युद्ध होण्याची भीती आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे जिल्हा समन्वयक आनंदा शिंदे यांनी व्यक्त केली.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, मनवेल बारदेस्कर एज्युकेशन सोसायटी गारगोटी व पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने शिरगाव (ता. राधानगरी) येथे ग्रा.पं कार्यालयात ‘हर घर नलसे जल’अंतर्गत क्षमता बांधणी प्रशिक्षण शिबिरात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच संदीप पाटील होते. सरपंच माधवी चौगले, प्रियांका नरके, कोमल हळदे, मीना कांबळे, भारती कांबळे, कांचन कुंभार, उपसरपंच संदीप पाटील उपस्थित होते.
ग्रामसेवक अशोक भांदिगरे यांनी स्वागत, ग्रा.पं सदस्य मधुभाऊ किरूळकर यांनी प्रास्ताविक केले. संदीप पाटील यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून उद्घाटन झाले. दोन दिवसीय शिबिरात सत्यवान भागते, संदीप पाटील, विश्वजीत पाटील, स्वाती पाटील यांनी जलजीवन मिशनची उद्दिष्टे, घनकचरा व्यवस्थापन, पाणी दूषित होण्याची कारणे, स्वच्छ व निर्जंतुक पाणी मिळविण्याचे उपाय व पाणीपुरवठा समितीसह ग्रामस्थांच्या जबाबदाऱ्यांविषयी मार्गदर्शन केले. यावेळी शिरगाव, सिरसे, म्हासुर्ली, गवशी, बुरंबाळी, राशिवडे खुर्द, बेले, चक्रेश्वरवाडी, कुंभारवाडी, केळोशी, खामकरवाडीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य, अंगणवाडीसेविका, मदतनीस, आशा कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी उपस्थित होते. राजश्री पोवार यांनी सूत्रसंचालन, कमल पाटील यांनी आभार मानले.