पुंगाव केंद्रशालेत वार्षिक स्नेहसंमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुंगाव केंद्रशालेत वार्षिक स्नेहसंमेलन
पुंगाव केंद्रशालेत वार्षिक स्नेहसंमेलन

पुंगाव केंद्रशालेत वार्षिक स्नेहसंमेलन

sakal_logo
By

02322
पुंगाव ः येथील केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनात विविध गुणदर्शनामध्ये रंगमंच्यावर अवघी शिवशाही साकारली. (राजू कुलकर्णी ः सकाळ छायाचित्रसेवा)

पुंगाव केंद्रशाळेत स्नेहसंमेलन
राशिवडेः पुंगाव (ता. राधानगरी) येथील केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी रंगमंचावर अवघी शिवशाही अवतरली होती. निमित्त होते वार्षिक स्नेहसंमेलन आणि विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे. महाराष्ट्राच्या समृध्द परंपरेचे प्रतिबिंब या सदराखाली शिवरायांच्या जीवनातील अनेक प्रसंग या वेळी सादर करण्यात आले. सरपंच संजीवनी पाटील, उपसरपंच दशरथ भिवशेकर यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. पुरस्कारप्राप्त गणेश पाटील व विस्तार अधिकारीपदी नियुक्ती झालेले मुख्याध्यापक आ. रा. सुतार यांचा सत्कार झाला. मराठी, हिंदी गीतांच्या तालावर बालचमूनी उपस्थिताना ठेका धरायला लावला. शिवराज्याभिषेक प्रसंगाने समारेप झाला. गणेश पाटील यांनी सुत्रसंचालन केले. ब. पू कांबळे, आ. रा. सुतार यांनी मनोगत व्यक्त केले.