शिरगाव येथे शैक्षणिक साहित्य वाटप

शिरगाव येथे शैक्षणिक साहित्य वाटप

02331
शिरगाव ः येथे शैक्षणिक साहित्य वाटपप्रसंगी बोलताना संदीप पाटील, शेजारी मान्यवर.
----------------------------------
शिरगावला शैक्षणिक साहित्य वाटप
शिरगाव : समाजऋणातून मुक्त होण्यासाठी लोकोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या कै. शंकर धोंडी पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे कार्य अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन सरपंच संदीप पाटील यांनी केले. कै. शंकर धोंडी पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, कंथेवाडीतर्फे माजी आम कै. शंकर धोंडी पाटील जन्मशताब्दीनिमित्त येथे प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटपप्रसंगी ते बोलत होते. पोलिसपाटील संघटनेचे माजी उपाध्यक्ष डी. के. पाटील, उपसरपंच संदीप पाटील, सचिव अभिजीत पाटील, मुख्याध्यापक आनंदा भोपळे, शाळा समिती अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष संदीप कांबळे प्रमुख उपस्थित होते. स्वागत विलास चौगले यांनी, अध्यक्ष वसंतराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. ग्रा.पं. सदस्य मधुकर किरूळकर, अश्विनी पोवार, ब्रह्मदेव पाटील, दीपक पाटील, संदीप चरापले, युवराज बरगे, सागर पोवार यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप झाले. अश्विनी पाटील, प्रा. अमर पाटील, संदीप पाटील, व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते. सागर पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com