
चंदगड अर्बन लाभांश
चंदगड अर्बन कडून लाभांश वर्ग
चंदगड : येथील चंदगड अर्बन बँकेकडून सभासदांना वाटप करण्यात येणारी लाभांश रक्कम रिझर्व बँकेची परवानगीने त्यांच्या खात्यावर वर्ग केली. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण चौगुले यांनी ही माहिती दिली. १५ वर्ष बँकेकडून लाभांश रक्कम वाटप केली नव्हती. बँकेची आर्थिक स्थिती अडचणीची असल्याने लाभांश वाटपावर बंधन घातले होते. मात्र विद्यमान संचालक मंडळाने काटकसरीने कारभार करून बँकेला अडचणीच्या गर्तेतून बाहेर काढले. बँकेचे एकूण व्यवहार पाहून रिझर्व बँकेने यावर्षी लाभांश वाटपाला परवानगी दिली. बँकेचे अध्यक्ष दयानंद काणेकर, उपाध्यक्ष बाबू हळदणकर यांच्यासह सर्व संचालकांनी यासाठी परिश्रम घेतले. दरम्यान ही रक्कम सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. ज्या सभासदांची बँकेची सेव्हींग खाती नसतील किंवा केवायसी पूर्ण केले नसेल त्यांनी आपल्या कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी असे आवाहन चौगुले यांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b01833 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..